बालाजी टेलिफिल्म निर्मित लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य’च्या सेटवर आग लागली आहे. चित्रीकरण सुरु असताना शॉक सर्किट झालं परिणामी सेटवर आग लागली. ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.
करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे मनोरंजन उद्योगाला जबरदस्त फटका बसला आहे. या आर्थिक नुकसानातून बाहेर येण्यासाठी सरकारने चित्रीकरणाची परवानगी दिली. परंतु चित्रीकरण सुरु होताच ‘कुम कुम भाग्य’च्या सेटवर आग लागली. या आगीमुळे चित्रीकरण त्वरीत थांबवण्यात आलं आहे. पुढील काही दिवस या सेटवर चित्रीकरण केलं जाणार नाही.
View this post on Instagram
‘कुमकुम भाग्य’ ही टेलिव्हिजनवरील सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सृती झा आणि शब्बीर अहलूवालिया यांनी मालिकेत मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. या आगीमुळे नव्या भागांच्या चित्रीकरणाला काही काळ स्तगिती मिळाली आहे.