‘दबंग’ फेम बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या आगामी ‘तेवर’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘राधा नाचेगी’ गाण्याचे चित्रीकरण झाले त्यादरम्यानची काही छायाचित्रे सोनाक्षीने इंस्टाग्रामवरून शेअर केली.
छायाचित्रांवरून गाण्यात सोनाक्षीची मनमोहक नजाकत सोनाक्षी ‘फॅन्स’ना पहायला मिळेल. ‘म्युझिक बजेगा लाऊड तो राधा नाचेगी..’ असे या गाण्याचे बोल असून सोनाक्षी फिकट पांढऱया रंगाच्या लेहंगा चोलीत मोहक अदांमुळे उठून दिसते.

सोनाक्षीची या गाण्यातील वेशभूषा तब्बल ७५ लाख रुपयांची असल्याचे सांगण्यात आले आहे. गाण्याचे नृत्य दिग्दर्शन रेमो डिसूझाने केले आहे त्यामुळे गाण्यात तितकाच रेमो अंदाजही असण्याची शक्यता आहे.
गाण्याच्या चित्रीकरणाचा खर्च जवळपास २.५ कोटी रुपयांपर्यंत झाला आहे. त्यामुळे सोनाक्षीच्या ‘तेवर’ची उत्सुकता रसिकांमध्ये वाढली आहे.
सोनाक्षी सोबत ‘गुंडे’स्टार अर्जून कपूर या चित्रपटात अभिनेता असून एका कबड्डी खेळाडूची भूमिका अर्जुन साकारत आहे. चित्रपटाचे सध्या उत्तरप्रदेशमध्ये चित्रीकरण सुरू आहे.