आज अजय देवगण म्हटलं की वेगळे काहीही सांगावे लागत नाही. ‘फूल और कांटे’ हा त्याचा पहिला चित्रपट निर्माती अवस्थेत असताना काय ऐकायला मिळाले माहित्येय? मारहाण दिग्दर्शक वीरु देवगण याचा मुलगा अजय आणि हेमा मालिनीची भाची मधु कुक्कू कोहली दिग्दर्शित चित्रपटातून एकत्र रुपेरी पदापर्ण करीत आहेत. म्हणजे त्यांची स्वत:ची ओळख नव्हती. कशी असेल म्हणा. पहिलाच चित्रपट असल्याने त्याच्या यशापयशावर कोणत्या चेहऱ्याकडे किती लक्ष द्यायचे दुर्लक्ष करायचे याचे गणित असते ना? दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधला ‘विश्वात्मा’च्या पार्टीतला आँखो देखा हाल सांगायला हवाच. त्या चित्रपटात असणाऱ्या-नसणाऱ्या सर्व स्टार्सना स्टेजवर बोलावले गेले, सगळे चमकून झाले असे वाटले, तेवढ्यात दिग्दर्शक राजीव रॉयच्या लक्षात आले वीरु देवगणचा सुपूत्र पार्टीत आहे. अजयच्या वागण्यातला नवखेपणा अजिबात लपला नव्हता… जुहूच्या सुमीत प्रिव्ह्यूत ‘फूल और काटें’ची गाणी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना दाखवून मग पार्टीचे आयोजन होते. तेव्हा ती गाणी आणि त्यातला अजयचा आत्मविश्वासपूर्ण वावर यावरच्या प्रतिक्रियांतून तो थोडासा मोकळा होत गेल्याचे जाणवले. विशेषत: एका मारधाड दृश्याचा तुकडा त्याची खरी ओळख दाखवणारा होता. तो मारहाण दिग्दर्शकाचा मुलगा असून, आपली तब्येतह पिळदार ठेवली आहे. (तेव्हा तो दिग्दर्शक विजय आनंद आणि हॅण्डसम विनोद खन्नाचा चाहता होता.) हे छायाचित्र ‘फूल और काटें’च्या पहिल्या पार्टीचे आहे. तेव्हा तो काहीसा सुनील दत्तसारखा दिसतो का हो?