News Flash

…म्हणून बॉबी देओलच्या ‘क्लास ऑफ ८३’ला प्रदीप शर्मांनी बजावली नोटीस

वाचा, नेमकं काय असेल कारण

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलचा ‘क्लास ऑफ ८३’ हा चित्रपट २१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र या प्रदर्शनावर आता टांगती तलवार आहे. माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी निर्मात्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. यात चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो दाखविण्याची मागणी त्यांनी केली आहे.’नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे.

“माझे वकील रिजवान मर्चेंट यांच्या माध्यमातून मी रेड चिलीज एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड, नेटफ्लिक्स इंटरटेन्मेंट सर्व्हिस इंडिया लिमिडेट आणि सैय्यद हुसैन जैदी यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे”, असं प्रदीप शर्मा म्हणाले.

“जर चित्रपट प्रदर्शनापूर्वी मला चित्रपट दाखविला नाही, तर या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्यासाठी मी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेईन आणि निर्मात्यांवर सिव्हिल आणि क्रिमिनल खटलाही दाखल करेन”, असं प्रदीप शर्मा यांनी सांगितलं.

दरम्यान, ‘क्लास ऑफ ८३’ मध्ये त्यांच्याविषयी योग्य माहिती दाखविण्यात आली की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांना प्रथम चित्रपट पाहायचा आहे. या चित्रपटात अभिनेता बॉबी देओल मुख्य भूमिकेत झळकणार असून त्याच्यासोबत अनूर सोनी, विश्वजीत प्रधान, जॉय सेनगुप्ता महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. परंतु, आता हा चित्रपट कोणत्याही अडचणींशिवाय २१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 12:20 pm

Web Title: former encounter specialist pradeep sharma sent legal notice to film class of 83 producers ssj 93
Next Stories
1 कंगनाच्या सुरक्षेसाठी आईने केली पूजा; पाहा व्हिडीओ
2 ‘अभय 2’ मधील ‘त्या’ फोटोप्रकरणी Zee 5 ने मागितली माफी, म्हणाले…
3 गुंजनबरोबर काम केलेल्या महिला पायलटचे पत्र : करणवर खोटी माहिती पसरवण्याचा आरोप तर जान्हवीला दिला सल्ला
Just Now!
X