News Flash

Video: नागाची चार मांजरींसोबत ‘कॅट-फाइट’; नील नितीन मुकेशने केलं शूट

पाहा थरारक झुंजीचा व्हिडीओ

चार मांजरी आणि एक नाग.. या थरारक झुंजीचा व्हिडीओ अभिनेता नील नितीन मुकेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. शूटिंगदरम्यान त्याला सेटच्या परिसरात ही झुंज पाहायला मिळाली आणि त्याने तो मोबाइलवर शूटदेखील केला. व्हिडीओतील नाग हा कोब्रा असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला.

”बायपास रोड या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मांजर आणि नागाची झुंज पाहायला मिळाली. कारमधून बाहेर पडलो आणि ते शूट केलं,” असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं. चारही मांजरींना मात देत तो नाग कशाप्रकारे स्वत:ला वाचवतो हे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पण यावर काही नेटकऱ्यांनी टीकासुद्धा केली आहे.

अशावेळी व्हिडीओ शूट करण्यात मग्न होण्यापेक्षा सर्पमित्रांना तिथे बोलावणं गरजेचं आहे असं एकाने म्हटलं. त्यावर नीलने त्या युजरला उत्तरदेखील दिलं. ‘सर्पमित्राला बोलावून नागाला योग्य ठिकाणी सोडण्यात आले आहे,’ असे त्याने युजरले सांगितले.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला इन्स्टाग्रामवर ८० हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 7:06 pm

Web Title: four cats fight a snake in this shocking video shot by actor neil nitin mukesh ssv 92
Next Stories
1 आलिया नाही, तर ‘हे’ आहेत रणबीरचे लकी चार्म
2 ‘द कपिल शर्मा शो’मध्ये रिंकू भाभी परत येणार? सुनीलचं सूचक ट्विट
3 देश महिलांसाठी सुरक्षित नाही हे न सांगण्यात कसली देशभक्ती?- रिचा चड्ढा