तुम्हाला २०१३ मध्ये आलेला सुपरहिट विनोदी सिनेमा ‘फुकरे’ आठवतोय का? आता या सिनेमाचा सिक्वल येत आहे. ‘फुकरे रिटर्न’चे चित्रिकरण संपल्यानंतर आता या सिनेमाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ८ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात जुनीच स्टार कास्ट नव्याने पाहायला मिळणार आहे.
मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित ‘फुकरे रिटर्न’मध्ये अली फजल, मनजोत सिंग, रिचा चड्ढा, वरुण शर्मा आणि पुलकित सम्राट यांची मुख्य भूमिका आहे. परत एकदा ही जुनी टीम नव्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. ‘फुकरे’मध्ये रिचाने जास्त दरात व्याज घेऊन उधारी देणाऱ्या भोली पंजाबनची व्यक्तीरेखा साकारली होती. ‘फुकरे रिटर्न’मध्ये रिचा एका गँगस्टरची भूमिका साकारणार आहे.
अनेकदा नावाजलेले कलाकार असतील तरच सिनेमा हिट होतो असे म्हटले जाते. पण ‘फुकरे’ या सिनेमात कोणताही मोठा चेहरा नसतानाही हा सिनेमा चांगलाच गाजला होता. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एण्टरटेनमेन्ट या बॅनर अंतर्गत बनलेल्या या सिनेमाने तिकीट बारीवर चांगली कमाई केली होती. आता ‘फुकरे रिटर्न’ लोकांना तेवढाच आवडतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
The jugaadu boys are back to bring some Fukrapanti in your lives. #FukreyReturns on 8th December. pic.twitter.com/WPW4KgU8Kd
— Excel Entertainment (@excelmovies) March 17, 2017