बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत जे प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली असली तरी प्रेक्षक आजही ते तितक्याच आनंदाने बघतात. या यादीमधला एक चित्रपट म्हणजे ‘गदर: एक प्रेम कथा.’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे. पण या चित्रपटाची कथा थोडी वेगळी असणार आहे.
‘पिंकव्हिला’ला जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘गदर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण ‘गदर २’ चित्रपटाची कथा ही ‘गदर’ पेक्षा थोडी वेगळी असणार आहे. या चित्रपटात तारा सिंह पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये जाणार आहे. पण तो सकीनासाठी नाही तर त्यांचा मुलासाठी जाणार आहे. त्यामुळे गदर चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये एक वेगळी कथा पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
View this post on Instagram
गेल्याच महिन्यात ‘गदर’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले होते. त्यांनी ‘गदर २’ बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ते लवकरच चित्रपटाची घोषणा करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
गदर चित्रपटात तारा सिंहची भूमिका अभिनेता सनी देओलने साकरली होती. तर सकीनाच्या भूमिकेत अभिनेत्री अमिषा पटेल दिसली होती. त्यांच्या मुलाची भूमिका उत्कर्ष शर्माने साकारली होती. आता ‘गदर २’मध्ये हेच कलाकार दिसणार आहेत. अनिल शर्मा चित्रपटाच्या स्क्रीप्टवर सध्या काम करत आहेत.