01 October 2020

News Flash

आर्यनचा फोटो पोस्ट करताना गौरीला कोणाची वाटतेय भीती?

आर्यनचा हा फोटो अनेकांचे लक्ष वेधतोय.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान

बॉलिवूडचा ‘बादशहा’ शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर दरवर्षी सात दिवसांकरिता बाप्पाचे आगमन होते. गुरूवारी सर्वत्र गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यात आले. शाहरुखनेही पत्नी गौरी, मुलगी सुहाना आणि छोटा मुलगा अब्राम यांच्यासह गणरायाचे विसर्जन केले. यावेळचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. मात्र या फोटो आणि व्हिडिओंमध्ये शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन कुठेच दिसत नव्हता. गौरीने नुकताच आर्यनचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर पोस्ट केलाय. मात्र हा फोटो पोस्ट करताना तिला कोणीतरी ओरडेल अशी भीती वाटतेय.

गौरी खान इन्स्टाग्रामवर बरेच फोटो पोस्ट करताना दिसते. बी-टाऊनमधील तिच्या मित्रमैत्रिणींसोबतचे फोटो अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर दिसून येतात. करण जोहर, काजोल, राणी मुखर्जी, श्रीदेवीपासून अनेकांसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. नुकताच तिने आर्यनचा एक फोटो पोस्ट केलाय. अनेकांची नजर आर्यनच्या या फोटोवर खिळली असतानाच गौरीने त्याखाली दिलेली कॅप्शनसुद्धा लक्ष वेधतोय. ‘माझ्या मुलाच्या परवानगीशिवाय मी त्याचा फोटो पोस्ट करतेय… माझ्यावर तो ओरडणार नाही अशी मी आशा करते,’ असं कॅप्शन गौरीने दिलीय. आर्यन त्याच्या फोटोंविषयी खूप सजग असतो हेच यातून स्पष्ट होतेय. त्यामुळेच न विचारता सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यामुळे ओरडेल की काय अशी भीती गौरीला वाटतेय.

वाचा : मी पूर्ण ताकदीने परत येणार- कपिल शर्मा 

आर्यन खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा असून त्यापूर्वीच त्याचा चाहतावर्ग निर्माण झालाय. अनेकांना तो बाबांची कार्बन कॉपीच असल्याचे वाटते. नुकत्याच एका मुलाखतीत शाहरुखने आर्यनच्या करिअरबद्दल वक्तव्य केले. ‘त्याच्या महत्त्वाकांक्षांबद्दल, भविष्यात त्याला नेमके काय करायचे आहे. याबद्दल तो माझ्याशी बोलतो. त्याला माझ्यापेक्षा मोठे व्हायचं आहे आणि हे चांगले आहे,’ असे शाहरुख म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 8:12 pm

Web Title: gauri khan shared a photo of son aryan khan but read why she is afraid of getting fired
Next Stories
1 जिया खान आत्महत्याप्रकरणी सूरज पांचोलीविरोधात खटला, उच्च न्यायालयाचे आदेश
2 मी पूर्ण ताकदीने परत येणार- कपिल शर्मा
3 अभिनेत्री संजीदा शेख आणि तिच्या कुटुंबियांविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल
Just Now!
X