06 December 2019

News Flash

मला अभिनेता व्हायचं होतं म्हणून प्रेयसीनं केलं ब्रेकअप- कार्तिक

करणनं त्याला रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारला होता

‘लुका छुपी’, ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टिटु की स्वीटी’, ‘प्यार का पंचनामा २’ यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता कार्तिक आर्यन सध्या चर्चेत आहे. कार्तिकचं नाव गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान आणि अनन्या पांड्येशी देखील जोडलं गेलं आहे. मात्र आपण फक्त एकाच मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होतो आणि मला अभिनयात करिअर करायचं आहे हे तिला कळल्यानंतर तिनं ब्रेकअप केलं असं कार्तिकनं कबुल केलं.

कार्तिकनं नुकतीच ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी करणनं त्याला रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना उमेदीच्या काळात आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं कार्तिकनं कबुल केलं. मात्र अभिनयात मला करिअर करायचं आहे हे समजल्यावर तिनं माझ्याशी ब्रेकअप केलं असंही कार्तिक म्हणला.

कार्तिक सध्या अनन्या पांड्येला डेट करत असल्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये आहे. अनन्या करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मात्र कार्तिकनं अनन्याला डेट करत असल्याची गोष्ट नाकारली आहे. ती माझी चांगली मैत्रीण आहे असं उत्तर कार्तिकनं दिलं. काही दिवसांपूर्वी सारा अली खान हिनं कार्तिकसोबत डेटवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र जोपर्यंत बँक खात्यात बक्कळ रक्कम जमा होत नाही तोपर्यंत साराला डेटवर नेणार नाही असाही पण कार्तिकनं केला आहे.

First Published on February 11, 2019 1:33 pm

Web Title: girl dumped kartik aaryan because he wanted to be an actor
Just Now!
X