क्लो झाओ यांचा ‘नोमॅडलँड’, सॅशा बॅरॉन कोहेन यांचा ‘बोराट स्िब्सक्वेंट मुव्ही फिल्म’ (विनोदी गटात) या चित्रपटांनी गोल्डन ग्लोब पुरस्कारात बाजी मारली आहे. नोमॅडलँड हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.

करोना साथीमुळे आभासी पातळीवर हा पुरस्कार कार्यक्रम झाला. झाओ या चिनी अमेरिकी निर्मात्या असून त्यांना उत्कृष्ट  दिग्दर्शकाचाही पुरस्कार मिळाला आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावणाऱ्या त्या आशियायी वंशाच्या पहिल्या महिला दिग्दर्शक आहेत.

‘नोमॅडलँड’ या चित्रपटात फ्रान्सेस मॅकडॉरमंड यांनी नोकरी गेल्यानंतर रस्त्यावर आलेल्या एका विधवेची भूमिका साकारली असून व्हेनिस चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आला होता. त्याला युरोपीय महोत्सवातही गोल्डन लायन पुरस्कार मिळाला होता.

ब्लॅक पँथरमधील चॅडविक बोसमन यांना मरणोत्तर गौरवण्यात आले असून त्यांनी ट्रम्पेट वादक लेव्ही यांची भूमिका ‘मा रेनीज ब्लॅक बॉटम’ या चित्रपटात साकारली होती. बोसमन यांचा गेल्या वर्षी वयाच्या त्रेचाळिसाव्या वर्षी आतम्डय़ाच्या कर्करोगाने मृत्यू झाला होता. बोसमन यांच्या पत्नी सिमोनी लेडवर्ड यांनी हापुरस्कार स्वीकारला. त्यांनी सांगितले, की या पुरस्काराबद्दल त्यांनी देवाचे आभार मानले असते. ते जिवंत असते तर त्यांनी त्यांच्या आईवडिलांचेही आभार मानले असते.

‘दी युनाटेड स्टेटस व्हर्सेस हॉलीडे’ या चित्रपटासाठी अँड्रा डे यांनी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. तिने गायिका बिली हॉलीडेची भूमिका साकार केली होती.

हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन या संघटनेवर गोल्डन ग्लोब पुरस्कारात कृष्णवर्णीयांना स्थान देत नसल्याची टीका होत होती, त्यामुळे यावर्षी काही कृष्णवर्णीयांनाही गौरवण्यात आले आहे. टिना फे व अमी पोहियर यांनी न्यूयॉर्क व लॉसएंजल्स येथून या कार्यक्रमाचे संचालन केले.

हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन या संघटनेत ९० टक्के आंतरराष्ट्रीय कृष्णवर्णीयेतर पत्रकार असून दरवर्षी हे पुरस्कार त्या संघटनेकडून दिले जातात.

रोसामंड पाइक यांना ‘आय केअर नॉट’ चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. कोहेन यांचा ‘बोराट’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपट ठरला.

डॅनियल कालुया यांना उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. जॉडी फोस्टर हिला उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.  उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार अरॉन सोरकिन यांना ‘दी ट्रायल ऑफ दी शिकागो ७’ या चित्रपटासाठी देण्यात आला. कोरियन अमेरिकन चित्रपट ‘मिनारी’ हा वादग्रस्त असूनही  उत्कृष्ट परदेशी चित्रपट ठरला आहे. जेमी फॉक्स यांना ‘सोल’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीताचा  पुरस्कार मिळाला. ‘दी लाइफ अहेड’ या चित्रपटातील गीताला उत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला. नेटफ्लिक्सच्या ‘दी क्राऊन’ला चार पुरस्कार मिळाले, त्यात एम्मा कोरिन उत्कृष्ट अभिनेत्री तर जोश ओकॉनर उत्कृष्ट अभिनेता ठरला आहे. मार्गारेट थॅचर यांच्या भूमिकेसाठी गिलीयन अँडरसन यांना उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. स्टार वॉर अभिनेता जॉन बोयेगा याला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

२०२१ चे मानकरी

* उत्कृष्ट चित्रपट (नाटय)- नोमॅडलँड

* उत्कृष्ट चित्रपट (संगीत- विनोदी)- बोराट सबसिक्वेन्ट मुव्ही फिल्म

* उत्कृष्ट दिग्दर्शक- क्लो झाओ (नोमॅडलँड)

* उत्कृष्ट अभिनेत्री ( नाटय़) – अँड्रा डे (दी युनायटेड स्टेट्स व्हर्सेस बिली हॉलिडे)

* उत्कृष्ट अभिनेता (नाटय)- चॅडविक बोसमन( मा रेनीज ब्लॅक बॉटम)

* उत्कृष्ट अभिनेत्री (सांगीतिक-विनोदी)-  रोझमंड पाइक (आय केअर अ लॉट)

* उत्कृष्ट अभिनेता ( सांगीतिक- विनोदी)- सॅशा बॅरॉन कोहेन ( बोराट सबसिक्वेन्ट मुव्ही फिल्म)

* उत्कृष्ट सहायक अभिनेत्री- जॉडी फॉस्टर (द मॉरिटॅनियम)

* उत्कृष्ट सहायक अभिनेता – डॅनियल कालुया (जुडास अँड दी ब्लॅक मसिहा)

* उत्कृष्ट पटकथा – अ‍ॅरॉन सोरकिन ( द ट्रायस ऑफ दी शिकागो)

* उत्कृष्ट परदेशी चित्रपट- मिनारी

* उत्कृष्ट सचेतपट- सोल

* उत्कृष्ट मूळ संगीत – सोल

* उत्कृष्ट मूळ गाणे – लो सी ( द लाइफ अहेड)

* उत्कृष्ट दूरचित्रवाणी मालिका (नाटय़)- द क्राउन

* उत्कृष्ट दूरचित्रवाणी मालिका (सांगितिक- विनोदी)-शीटस क्रीक

* उत्कृष्ट दूरचित्रवाणी चित्रपट- द क्वीन्स गॅम्बिट

* उत्कृष्ट अभिनेत्री(नाटय़) जोरा ओकॉनर (दी क्राउन)

* उत्कृष्ट अभिनेत्री(सांगीतिक – विनोदी)- कॅथरिन ओ हारा

* उत्कृष्ट अभिनेता (सांगीतिक व विनोदी)- जॅसन सुडेकीस (टेड लासो)