03 December 2020

News Flash

गुगल म्हणतंय सलमान ‘बॉलिवूडचा वाईट अभिनेता’; ट्विटरवर संमिश्र प्रतिक्रिया

सध्या रेस ३ वगळता एका वेगळ्याच कारणामुळे सलमान चर्चेत असल्याचे दिसत आहे.

सलमान खान

सलमान खान हा आपल्या अभिनयासाठी आणि नवनवीन नृत्य प्रकारांसाठी कायम चर्चेत असतो. त्याने अनेक मोठे आणि लोकप्रिय चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत. सध्या रेस ३ या चित्रपटासाठी तो जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तगडी कमाई केली असून चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये जाईल, यात शंका नाही. मात्र सध्या रेस ३ वगळता एका वेगळ्याच कारणामुळे सलमान चर्चेत असल्याचे दिसत आहे.

गुगल या प्रसिद्ध सर्च इंजिनने सलमान खानला ‘बॉलिवूडमधील वाईट अभिनेत्यांच्या’ यादीत नेऊन बसवले आहे. गुगलवर ‘बॉलिवूडचा वाईट अभिनेता’ (worst Bollywood actor) असे सर्च केल्यांनतर त्यात सलमान खान याचे नाव दिसत आहे. अनेकांनी हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर काहींनी याचा संबंध थेट रेस ३ या चित्रपटाशी जोडला आहे.

एका युझरने हा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यांनतर ट्विटरवर प्रतिक्रियांचे वादळ उठले असून सलमानचे चाहते आणि इतर असा हे ‘ट्विट वॉर’ रंगताना दिसत आहे. एका युझरने यावर ट्विट केले आहे की ‘सलमान बॉलिवूडचा वाईट’ आहे, हे मला माहितीच होते. पण आत गुगलमुळे ते सिद्ध झाले. कोणीही रेस ३ चित्रपट पाहायला जाऊन आपले पैसे फुकट घालवू नका. त्यापेक्षा इरफान खान अभिनित ‘ब्लॅकमेल’ हा चित्रपट पहा. तर ‘ज्यावेळी मी ‘बॉलिवूडचा वाईट अभिनेता’ असे सर्च करतो, तेव्हा गुगल सलमानला ईद या सणाच्या शुभेच्छा देत आहे’, असे एका युझरने कमेंट केली आहे. एका युझरने तर अतिशय मजेशीर पण सलमानच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट अशी वाटणारे ट्विट केले आहे. ‘तुम्ही गुगल वर बॉलिवूडचा वाईट अभिनेता असे सर्च करा, त्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या उत्तरामुळे तुम्हाला मनापासून शांतता वाटेल’, असे त्याने ट्विट केले आहे. तर एकाने ‘गुगल हे कधीच खोटं बोलत नाही’, अशा शब्दात सलमानला ट्रोल केले आहे.

दरम्यान, या सर्व ट्विटवर सलमानच्या चाहत्यांनी मात्र अत्यंत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच, काही चाहत्यांनी याबाबत गुगलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, एका चाहत्याने आपल्या या ट्विटमध्ये सलमानला टॅग केले असून सलमाननेच गुगलला याबाबत जाब विचारवा, अशी भावना व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 7:59 pm

Web Title: google search result salman worst bollywood actor
टॅग Google,Salman Khan
Next Stories
1 कचरा फेकण्यासाठी रस्ता नाही कचराकुंडी वापरा! कचरा फेकणाऱ्या व्यक्तीला अनुष्काने सुनावलं
2 Big Boss Marathi: देखो… वो आ गया; राजेश श्रृंगारपुरे पुन्हा ‘बिग बॉस’च्या घरात
3 प्रियांका चोप्राने उघड केले तिचे फॅशन सिक्रेट!
Just Now!
X