27 September 2020

News Flash

मराठी मालिकेत प्रथमच ‘अंडरवॉटर’ चित्रीकरण

कोकणाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका आधारित आहे.

'गोठ' या मालिकेचं काही चित्रीकरण अंडरवॉटर करण्यात आलं आहे.

मराठी टीव्ही मालिकांमध्ये नवा प्रवाह आणताना ‘स्टार प्रवाह’नं त्याला भव्यता आणि तंत्रज्ञानाचीही जोड दिली आहे. १० ऑक्टोबरपासून सोमवार ते गुरुवार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होत असलेल्या ‘गोठ’ या मालिकेचं काही चित्रीकरण अंडरवॉटर करण्यात आलं आहे. मराठी टीव्ही मालिकांमध्ये ‘अंडरवॉटर’ चित्रीकरणाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
‘गोठ’ या मालिकेचा टीजर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘आता थांबायचं नाय’ म्हणत नायिकेनं पुरुषसत्ताक पद्धतीला थेट आव्हान दिल्याचं या टीजरमधून दिसत आहे. त्यामुळे मालिका नक्कीच वेगळ्या विषयावर भाष्य करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अत्यंत वेगळ्या पद्धतीचा हा टीजर मालिकेविषयी उत्सुकता निर्माण करत आहे. सोशल मीडियावर या टीजरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
radha-1
हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये मोठं नाव असलेल्या  छाया दिग्दर्शक अभिषेक बासू यांच्या मार्गदर्शनाखाली अंडरवॉटर चित्रीकरण करण्यात आलं आहे. अभिषेक हा बर्फीसारखे उत्तम चित्रपट केलेल्या प्रख्यात दिग्दर्शक अनुराग बासूचा भाऊ आहे. ‘गोठ’ ही अभिषेकची पहिलीच मराठी मालिका आहे. फिल्मसिटीतील तलावामध्ये आणि एका स्विमिंग पूलमध्ये खास व्यवस्था करून हे चित्रीकरण झालं. अंडरवॉटर चित्रीकरण फार खर्चिक असतं. त्यासाठी खास व्यवस्था करावी लागते. मात्र, अभिषेकनं मांडलेली अंडरवॉटर चित्रीकरणाची कल्पना मालिकेची निर्मिती संस्था फिल्म फार्म आणि स्टार प्रवाह यांनीही ‘आता थांबायचं नाही’ या विचारानं उचलून धरली.  आणि ही कल्पना प्रत्यक्षात आणली. त्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे, अंडरवॉटर चित्रीकरणातील तज्ज्ञ छायालेखकांनी काम केलं. भव्यता आणि उत्तम वातावरण निर्मिती करणारं छायांकन हे या मालिकेचं खास वैशिष्ट्य ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 5:18 pm

Web Title: goth new serial on star prawah
Next Stories
1 प्रियांकाच्या सौंदर्यप्रसाधनांचा खर्च जाणून व्हाल थक्क!
2 ‘कॉफी विथ करण’ मधूनही फवादची गच्छंती..
3 द्रौपदीची व्यक्तिरेखा साकारण्याची रिचाची इच्छा
Just Now!
X