News Flash

Video: २० वर्षींनी गोविंदा आणि नीलम आले एकत्र; ‘आप के आ जाने से’ गाण्यावर केला डान्स

८०-९०च्या दशकात नीलम आणि गोविंदा ही जोडी हिट होती.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो म्हणून ‘सुपर डान्सर ४’कडे पाहिले जाते. या कार्यक्रमातील स्पर्धकांनी त्यांच्या नृत्य कौशल्याने अनेकांची मने जिंकली आहेत. या कार्यक्रमाला हजेरी लावणारे पाहुणे कलाकार कार्यक्रमाला आणखी चार चाँद लावतात. नुकताच या कार्यक्रमात अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री नीलम कोठारी यांनी हजेरी लावली. दरम्यान त्यांनी ‘आप के आ जाने से’ गाण्यावर डान्स केला असून त्यांच्या व्हिडीओ चर्चेत आहे.

गोविंदा आणि नीलम यांची जोडी एकेकाळी सुपरहिट होती. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना पाहायला आवडत होती. आता दोघांनी एकत्र ‘सुपर डान्सर ४’ या कार्यक्रमात हजेरी लावली. जवळपास २० वर्षांनंतर त्यांनी सुपरहिट गाणे ‘आप के आ जाने से’वर डान्स केला आहे. त्यांचा डान्स पाहून कार्यक्रमाचे परिक्षक शिल्पा शेट्टी, अनुराग बासू, गीता कपूर हे आनंदी झाल्याचे पाहायला मिळते. गोविंदा आणि नीलम यांचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत.

Video: २१ वर्षांनंतर शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टीने रिक्रिएट केला ‘धडकन’मधील तो सीन

 

View this post on Instagram

 

A post shared by Samir Soni (@samirsoni123)

नीलम कोठारी यांचे पती समीर सोनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नीलम आणि गोविंदाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी, ‘आणि २० वर्षांची प्रतिक्षा संपली’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

८०-९०च्या दशकात नीलम आणि गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. ‘घराना’, ‘खुदगर्ज’, ‘सिंदूर’, ‘हत्या’, ‘लव 86’, ‘दो कैदी’, ‘इल्जाम’, ‘फर्ज की जंग’, ‘बिल्लू बादशाह’, ‘ताकतवर’, ‘घर में राम गली में श्याम’, ‘दोस्त गरीबों का’ हे त्यामधील काही चित्रपट. त्यावेळी त्यांची जोडी हिट होती. आता त्यांना जवळपास २० वर्षांनंतर एकत्र पाहून चाहते आनंदी झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 12:17 pm

Web Title: govinda and neelam kothari to reunite after 20 years on super dancer chapter 4 stage avb 95
Next Stories
1 ‘टप्पू’ आणि ‘जेठालाल’मध्ये झाले भांडण? राज अनादकतनी केला खुलासा
2 “तिने माझे मानसिक आणि शारिरीक शोषण केले…”, शिवम पाटीलने अभिनेत्रीवर केला आरोप
3 ‘ये रिश्ता क्या कहलता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक, पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई
Just Now!
X