News Flash

हृतिकसोबत असलेल्या या मुलाला ओळखलंत का?; आता आहे सर्वांत लोकप्रिय अभिनेता

चित्रपटसृष्टीतील त्याचा प्रवास पाहून अनेकांनाच हेवा वाटतो.

छाया सौजन्य- सोशल मीडिया

जुन्या फोटो अल्बममधून कोणत्या आठवणी, कोणते फोटो समोर येतील हे सांगता येत नाही. मात्र अल्बम पाहताना त्यातील प्रत्येक फोटोच्या आठवणीत आपण रमून जातो. अशीच एक आठवण बॉलिवूडच्या एका अभिनेत्याने त्याच्याकडे जपून ठेवली आहे. बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशनसोबतचा त्याचा हा फोटो आहे. हृतिकच्या ‘फिजा’ या चित्रपटाच्या सेटवर काढलेला हा फोटो आहे. या फोटोमध्ये हृतिकच्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या मुलाला तुम्ही ओळखलंत का?

तर फोटोतील हा मुलगा आहे अभिनेता विकी कौशल. हृतिकप्रमाणेच विकीचीसुद्धा आता तरुणाईमध्ये फार क्रेझ आहे. ‘कहो ना प्यार है’ तेव्हा नुकताच प्रदर्शित झाला होता आणि हृतिकची देशभरात भरपूर क्रेझ होती. ‘ड्रॉव्हर साफ करताना मला हा फोटो सापडला. मी हृतिकच्या ‘फिजा’ चित्रपटाच्या सेटवर गेलो होतो तेव्हाचा हा फोटो आहे. त्यावेळी ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता आणि मीसुद्धा त्याच्या असंख्य चाहत्यांपैकीच एक होतो. त्यावेळी मला सांगण्यात आलं होतं की, हृतिक त्यांनाच भेटतो ज्यांना ‘इक पल का जीना’ या गाण्यावर नाचता येतं. मीसुद्धा त्या व्यक्तीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तीन दिवस या गाण्यावर नाचण्याची प्रॅक्टीस केली होती. पण, ज्यावेळी मी हृतिकला भेटलो, तेव्हाचा तो क्षण मी शब्दातही मांडू शकत नाही. जवळपास तासभर मी हृतिककडे नुसता बघतच होतो. कारण कदाचित माझ्यासाठी तो केवळ पुरुष नाही तर महापुरुष आहे’, असं भलंमोठं कॅप्शन लिहित विकीने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.

त्याच्या या कॅप्शनमधून एक अभिनेता म्हणून नव्हे तर, एक सर्वसामान्य चाहता म्हणून त्याने भावना व्यक्त केल्या. विकी सध्याच्या घडीला चांगलाच नावाजला जात आहे. ‘मसान’ या चित्रपटातील भूमिकेमुळे त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. त्याला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 9:39 am

Web Title: guess the child in this pic who is standing next to hrithik roshan ssv 92
Next Stories
1 Birthday Special : विकी कौशलचं शिक्षण माहितीये का?
2 कैफ नव्हे तर ‘या’ आडनावाने ओळखली जायची कतरिना
3 सेटवर रामानंद सागर यांच्या मुला आणि नातवासोबत मालिकेतील लक्ष्मण, पाहा फोटो
Just Now!
X