26 January 2021

News Flash

‘व्यायाम करण्यासाठी जीमची गरज नाही’; अभिनेत्रीने साडीवरच मारले पुशअप्स

'कधीही, कुठेही व्यायाम करा'; अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल...

बॉलिवूड अभिनेत्री गुल पनाग सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती नेहमीच चर्चेत असते. यावेळी तिने व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये ती चक्क साडीवर पुशअप्स मारताना दिसत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने व्यायाम करण्यासाठी आपल्या चाहत्यांना प्रेरित केलं आहे. “कधीही, कुठेही, कुठल्याही कपड्यांवर तुम्ही व्यायाम करु शकता” अशा आशयाची कॉमेंट तिने या व्हिडीओवर केली आहे. अभिनेत्रीचा हा लक्षवेधी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अवश्य पाहा – ‘नग्न असताना मला अधिक आध्यात्मिक वाटतं’; टीकाकारांवर सोफिया संतापली

 

View this post on Instagram

 

A post shared by Gul Panag (@gulpanag)

अवश्य पाहा – अंडरटेकर बनून ‘या’ अभिनेत्यानं केली होती अक्षय कुमारसोबत फाईट

गुल पनाग ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. २००३ साली ‘धुप’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘जुर्म’, ‘हेलो’, ‘समर २००७’, ‘अनुभव’, ‘रन’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली. दरम्यान ‘अब तक ५६’ या नाना पाटेकरांच्या चित्रपटातून ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. चित्रपटांसोबतच तिने ‘कश्मिर’, ‘खुबसुरत’, ‘मुसाफिर हू यारो’ यांसारख्या काही मालिकांमध्येही काम केलं आहे. अलिकडेच ती ‘द फॅमेली मॅन’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2020 12:25 pm

Web Title: gul panag doing pushups with wearing saree mppg 94
Next Stories
1 ‘या’ शर्यतीत सोनू सूदने अक्षय, शाहरुखला टाकलं मागे
2 ‘आजवरच्या यशात या चित्रपटाचं मोठं योगदान’; हृतिकच्या सुपरहिट चित्रपटाला १४ वर्षे पूर्ण
3 ‘त्यांना बंगला दिला, दिग्दर्शकांशी भेट घालून दिली, पण आता…’, कुमार सानू यांची जानच्या आरोपांवर प्रतिक्रिया
Just Now!
X