21 September 2020

News Flash

रणवीरचा अतिउत्साहीपणा नडला; चाहते जखमी

'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये परफॉर्म करताना अभिनेता रणवीर सिंगला त्याचा अतिउत्साहीपणा नडला.

रणवीर सिंग

‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये परफॉर्म करताना अभिनेता रणवीर सिंगला त्याचा अतिउत्साहीपणा नडला. कार्यक्रमात स्टेजवर रॅप साँग गात असताना त्याने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक स्टेजवरून चाहत्यांच्या गर्दीत उडी मारली. याबाबतची कोणतीही कल्पना नसल्याने चाहतेसुद्धा घाबरले. गर्दीत अचानक उडी मारल्याने काही चाहतेसुद्धा जखमी झाल्याचं समजतंय.

या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘गली बॉय’ या त्याच्या आगामी चित्रपटातील रॅप साँग गात असताना रणवीर अचानक त्याचा गॉगल आणि हॅट काढून स्टेजवरून चाहत्यांच्या गर्दीत उडी मारताना या व्हिडिओत दिसत आहे. या घटनेत काही महिलासुद्धा जखमी झाल्याचं कळतंय.

या घटनेनंतर सोशल मीडियावर रणवीरवर टीका होऊ लागली आहे. ‘हा बालिशपणा कमी कर, आता तरी मोठा हो’, अशी कमेंट काही युजर्सनी केली आहे. तर लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी रणवीर काहीही करू शकतो अशीही टीका काहींनी केली.

अशाप्रकारे चाहत्यांच्या गर्दीत रणवीरने उडी मारण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणवीरने अशाच प्रकारे चाहत्यांच्या गर्दीत उडी मारली होती. त्यावेळीही सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 8:11 pm

Web Title: gully boy actor ranveer singh jumps into a crowd of fans hurts a few
Next Stories
1 Video : ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ उत्तरार्धातील ‘नाच रे मोरा’ गाणं प्रदर्शित
2 नवाजुद्दीनच्या कुटुंबातील हा व्यक्ती करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण
3 भाभीजी काँग्रेस मे है ! शिल्पा शिंदेचा राजकारणात प्रवेश
Just Now!
X