24 January 2021

News Flash

…म्हणून ‘गली बॉय’मधील रणवीर-आलियाच्या चुंबन दृश्याला सेन्सॉरची कात्री

हे दृश्य वाईडर शॉटमध्ये बदलण्यात आलं आहे.

रणवीर , आलिया

झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी सतत धडपड करणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाची कथा सांगणारा ‘गली बॉय’ हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. मात्र चित्रपट प्रदर्शनापूर्वी यातील काही सीनवर सेन्सॉरने कात्री लावली आहे.

झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’मधील अनेक दृश्यांवर सेन्सॉरने कात्री लावली आहे. कात्री लावण्यात आलेल्या सीनमध्ये आलिया-रणवीरच्या चुंबन दृश्याचाही समावेश करण्यात आला आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये रणवीर-आलियाचं १३ सेकंदाचं चुंबन दृश्य दाखविण्यात आलं आहे. हा सीन दीर्घ असल्यामुळे तो कमी करण्यात आला असून त्याला वाईडर शॉटमध्ये बदलण्यात आलं आहे. वाईटर शॉट असल्यामुळे हा सीन प्रेक्षकांना जवळून पाहता येणार नाही. त्याप्रमाणेच चित्रपटात अनेक ठिकाणी वापरले गेलेले आक्षेपार्ह शब्द आणि शिव्याही बीप करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या चुंबनदृश्याप्रमाणेच चित्रपटातील अन्य काही दृश्यांवरही कात्री चालविण्यात आली आहे. चित्रपटाच्या ब्रॅण्ड पार्टनरच्या यादीतून ‘रॉयल स्टॅग’चं नावही वगळण्यात आलं आहे. रॉयल स्टॅग हा मद्याचा प्रकार असल्यामुळे चित्रपटातून कोणत्याही मादक पदार्थाची जाहिरात होता कामा नये, यासाठी हे नावही वगळण्यात आलं आहे. यापूर्वीच्या चित्रपटात उत्तेजक किंवा मादक पदार्थांच नाव असल्यास ते धुसर करण्यात येत होतं. मात्र पहिल्यांदाच कोणत्या तरी चित्रपटातून हे नाव वगळण्यात आलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 5:11 pm

Web Title: gully boy censor board cuts 13 seconds of ranveer alia passionate kiss
Next Stories
1 …म्हणून सईनं घेतला सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय
2 ‘ती फुलराणी’ : मंजू-शौनक संकटांना कसे सामोरे जाणार? पहा विशेष भाग
3 घाडगे & सून मालिकेमध्ये अक्षयसमोर येणार कियाराचे ‘ते’ सत्य
Just Now!
X