News Flash

#GullyBoy : रणवीर म्हणतोय, ‘अपना टाईम आएगा’

हा चित्रपट येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी सतत धडपड करणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाची कथा सांगणारा ‘गली बॉय’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहेत. काही दिवसापूर्वी या चित्रपटातील रणवीरचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे रणवीरच्या अभिनय कौशल्याव्यतिरिक्त अन्य गुणही दिसून आले. रणवीरच्या या व्हिडिओमध्ये तो रॅप साँग गाताना दिसून आला. हा व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर चांगलाच लोकप्रिय झाला. विशेष म्हणजे हे रॅप साँग ऐकल्यानंतर प्रेक्षकांच्या या चित्रपटाविषयी असलेली उत्सुकता आणखीनच वाढली आहे. त्यातच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.

‘अपना टाईम आएगा’ असे बोल असलेल्या या गाण्यात रणवीर एका हटके अंदाजात दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे गाणंदेखील रॅप साँग प्रकारात मोडणारं आहे. त्यामुळे हे गाणं सध्या तरुणाईमध्ये लोकप्रिय झालं आहे. या गाण्यामधून स्वप्न पूर्ण होण्यासाठी केलेली धडपड दाखविण्यात आली आहे.२ मिनीटे १० सेकंद असलेल्या या गाण्यात रणवीरसोबत आलिया भट्टदेखील दिसून येत आहे.

दरम्यान, हे गाणं खुद्द रणवीर सिंगनेच गायलं असून डब शर्मा आणि डिवाईन यांनी कंपोज केलं आहे. मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिवाईन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. झोया अख्तर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 1:52 pm

Web Title: gully boy song apna time aayega out
Next Stories
1 Photo : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची
2 शाल्मली म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’
3 Video : ‘Game Of Thrones Season 8’ चा टीझर प्रदर्शित
Just Now!
X