News Flash

हटके अन् रोमॅण्टिक अर्चन पूरणसिंगची लव्हस्टोरी; एका मासिकामुळे जुळल्या साताजन्माच्या गाठी

त्यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच आहे

अभिनेत्री, कॉमेडिन आणि सूत्रसंचालिका अशा विविध भूमिका अत्यंत शिताफीने पार पाडणाऱ्या अर्चना पूरणसिंगचा आज वाढदिवस. अर्चना पूरणसिंगने अनेक चित्रपट, शो यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबतची नाळ जोडून ठेवली आहे. अर्चना तिच्या अचूक विनोदबुद्धीसाठी विशेष ओळखली जाते. तिच्या ‘कुछ कुछ होता हैं’मधील ‘मिस ब्रिगेंजा’, ‘महोब्बते’मधील ‘प्रीतो’ आणि ‘बोल बच्चन’मधील ‘जोहर’ या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उतरल्या. त्यामुळे तिची कायम चाहत्यांमध्ये चर्चा असते. मात्र या चर्चांव्यतिरिक्त तिच्या लव्हस्टोरीची चर्चादेखील तितकीच रंगत असून तिची ही प्रेमकहाणी सुद्धा तेवढीच रंजक आहे.

अर्चना आणि परमीत सेठी यांची लव्हस्टोरी थोडी हटके पण तितकीच रोमॅण्टिक आहे. त्यामुळेच त्यांची लव्हस्टोरी कधीकाळी खूप गाजली होती. पहिल्या प्रेमामध्ये अपयशी ठरलेल्या अर्चनाने आयुष्यात पुन्हा कधीच लग्न करायचं नाही असं मनाशी ठाम ठरवलं होतं. मात्र याच काळात तिची भेट परमीत सेठीसोबत झाली. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

IT’S BEEN 28 YEARS SINCE I MARRIED THIS SEXY, BEAUTIFUL, MAD N CRAZY THING!! LOOKING FORWARD TO THE REST OF OUR JOURNEY TOGETHER!!!

A post shared by Parmeet Sethi (@iamparmeetsethi) on


एका पार्टीमध्ये परमीत आणि अर्चनाची पहिली भेट झाली. या पार्टीमध्ये अर्चना एक मासिक वाचत बसली होती. तिला असं मासिक वाचताना पाहून परमीतने पटकन तिच्या हातातलं मासिक हिसकावून घेतलं. परमीतचं हे वर्तन पाहिल्यानंतर अर्चनाला प्रचंड अपमानास्पद वाटू लागलं. मात्र परमीतने पटकन तिची माफी मागत हे मुद्दा केल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे अर्चनासोबत बोलण्याची संधी मिळावी यासाठी परमीतने हे मुद्दा हेतं. या घटनेनंतर त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमामध्ये झालं. विशेष म्हणजे हे प्रेम इथपर्यंतच सीमित न ठेवता या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

सूत्रांच्या माहितीनुसार, त्याकाळी अर्चना कायम परमीतला भेटल्यावर तीन गुलाबाची फुलं देत असे. चार वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या या निर्णयावर त्यांचे घरातले नाराज होते. मात्र तरीदेखील या दोघांनी लग्न केलं. दरम्यान, अर्चनाने अनेक मालिका, चित्रपट आणि टीव्ही शोज् मध्ये काम केलेलं आहे. सध्या ‘अर्चना द कपिल शर्मा’ या शोमध्ये पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 9:24 am

Web Title: happy birthday archana bollywood actress archana puran singh and parmeet sethi love story ssj 93
Next Stories
1 देव आनंद यांचे गाजलेले सर्वोत्तम १० चित्रपट
2 प्रेक्षकांना परतावा देण्यासाठीच विनोदी नाटकांमध्ये काम -प्रशांत दामले
3 रियाशी अमली पदार्थाबाबत सवांद साधल्याची रकुलप्रीतची कबुली
Just Now!
X