News Flash

‘त्या’ घटनेनंतर अमरीश पुरी-आमिर खान यांनी कधीच केलं नाही एकत्र काम

‘जबरदस्त’ चित्रपटाच्या सेटवर घडला 'हा' प्रसंग

‘त्या’ घटनेनंतर अमरीश पुरी-आमिर खान यांनी कधीच केलं नाही एकत्र काम

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता अमरीश पुरी यांनी अजरामर केलेल्या कित्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. खलनायक म्हणून प्रेक्षकांसमोर आलेले अमरीश पुरी यांच्यावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. आज ते आपल्या नसले तरी चित्रपटांच्या माध्यमातून कायम आपल्यासोबत आहेत. अमरीश पुरी यांच्यासोबत अनेक कलाकारांनी स्क्रीन शेअर केली आहे. यात अभिनेता आमिर खानच्या नावाचाही समावेश आहे. परंतु एका घटनेनंतर या दोघांनीही एकमेकांसोबत कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि दिवंगत अभिनेता अमरीश पुरी हे दोन्ही कलाकार बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी आहेत. मात्र ‘जबरदस्त’ या चित्रपटानंतर या दोघांनीही एकमेकांसोबत काम करण्याचं कटाक्षाने टाळलं.

१९८५ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘जबरदस्त’ या चित्रपटातील एका सीनमुळे अमरीश पुरी आणि आमिर खान यांच्यामध्ये वाद झाले होते. या चित्रपटामध्ये अमरीश पुरी यांची मुख्य भूमिका होती. तर आमिर सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत होता. या चित्रपटातील एक सीन चित्रीत करत असताना अमरीश पुरी करत असलेलं काम आमिरच्या पसंतीत पडत नव्हतं. त्यामुळे याविषयी त्याने अमरीश यांना सांगितलं. परंतु त्यानंतर या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. नंतर या दोघांनीही एकमेकांची माफी मागितली परंतु त्यानंतर हे दोघंही परत कधीच एकत्र दिसले नाहीत.

नासिर हुसेन दिग्दर्शित या चित्रपटातील एका सीनचं चित्रीकरण सुरु असताना आमिर अमरीश यांना काही सुचना करत होता. मात्र अमरीश यांनी आमिरच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. परंतु असं असताना सुद्धा आमिर त्यांना वारंवार सुचना करत होता. आमिरने लावलेला हा तगादा पाहून अमरीश पुरी यांचा राग अनावर झाला आणि ते सर्वांसमोर आमिरच्या अंगावर जोरात ओरडले. त्यानंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी आमिरची माफीही मागितली. मात्र त्यानंतर आमिरने त्यांच्यासोबत कधीच एकत्र काम केलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 8:45 am

Web Title: happy birthday special amrish puri was angry with aamir khan jabardast movie set ssj 93
Next Stories
1 Video : लग्नापासून घराणेशाहीपर्यंत सखी-सुव्रतशी मनमोकळ्या गप्पा
2 सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीविरोधात कोर्टात याचिका दाखल
3 अभिनव कश्यपच्या आरोपांवर अरबाज खानची प्रतिक्रिया; म्हणाला..
Just Now!
X