News Flash

Happy diwali 2017 : सेलिब्रिटींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

सलमान खानने अनोख्या अंदाजात चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत एक खास भेटही दिली आहे.

सध्या दिवाळीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे

 

आली दिवाळी असं म्हणत गेल्या एक- दोन दिवसांपासून सर्वत्र या सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटी विश्वातही या सणाचा उत्साह पाहायला मिळत असून, सोशल मीडियावरही या सणाचे वारे वाहत असून सेलिब्रिटींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन चाहत्यांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शेखर कपूर, गुल पनाग, चेतन भगत यांनी ट्विटरवरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना यानेसुद्धा एक सुरेख फोटो पोस्ट करत या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कलाकारांनी त्यांच्या त्यांच्या परिने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून, अनेकांनी त्यावर रिप्लायही दिला आहे. दिवाळीच्या निमित्ताने अनेक कुटुंब एकत्र येतात. त्याचाच प्रत्यय या कलाकारांच्या शुभेच्छांमधूनही पाहायला मिळत आहे.

अभिनेता सलमान खानने अनोख्या अंदाजात चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत एक खास भेटही दिली आहे. त्याने आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत अनेकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर दिवाळीचा हॅशटॅग ट्रेंडमध्ये असतानाच इथे कलाकारांच्या दिवाळीलाही दणक्यात सुरुवात झाली आहे. येत्या एक दोन दिवसांमध्ये या सणाची रंगत आणखीन पाहायला मिळणार यात शंकाच नाही. तेव्हा आता सेलिब्रिटींच्या पार्टीचे रंग आणि दिवाळीचा कल्ला कसा असणार हे पाहण्याकडेच अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2017 1:59 pm

Web Title: happy diwali 2017 celebrities wish on social media vivek oberoi gul panag
Next Stories
1 दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा ठरली ‘सेक्सिएस्ट वुमन अलाइव्ह’
2 Tiger Zinda Hai first poster: ‘टायगर’ची पहिली झलक पाहिली का?
3 ‘ते फ्लाइंग किस पतीसाठी नव्हे तर, बिग बींसाठीच’; ‘केबीसी’मधील स्पर्धकाच्या पत्नीचा खुलासा
Just Now!
X