News Flash

हरभजनच्या घरी…कोणीतरी येणार येणार गं!

पत्नी आणि अभिनेत्री गीता बसराने दिली गोड बातमी

क्रिकेटर हरभजन सिंगच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. या पाहुण्याचे आई बाबा आणि बहीण त्याच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचं दिसत आहे. अभिनेत्री आणि हरभजनची पत्नी गीता बसरा हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही गोड बातमी सांगणारे फोटोज शेअर केले आहेत.

आज गीताने आपण गरोदर असल्याची माहिती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली. गीताने स्वतःचे बेबी बम्पसोबतचे फोटोज शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Geeta Basra (@geetabasra)


त्याचबरोबर आपल्या परिवारासोबतचे काही फोटोज शेअर केले आहेत.  यात गीता, तिची मुलगी हिनाया आणि तिचा पती हरभजन हे दिसत आहेत.हिनायाने आपल्या हातात “Soon to be big sister” असा मजकूर लिहिला आहे.

“Coming soon….July 2021” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर गीता आणि हरभजन 29 ऑक्टोबर 2015ला लग्नबंधनात अडकले. तर 2016 साली त्यांची मुलगी हिनायाचा जन्म झाला.

गीताने आपल्या ऍक्टिंग करिअरची सुरुवात इमरान हाश्मीसोबत 2006 सालच्या ‘दिल दिया है’ या चित्रपटातून केली. त्यानंतर तिने ‘द ट्रेन’, ‘जिला गाजियाबाद’, ‘सेकंड हँड हजबंड’, ‘लॉक’ या चित्रपटांमध्येही काम केलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 7:28 pm

Web Title: harbhajan singhs wife and actress geeta basra pregnant with their second child vsk 98
Next Stories
1 ‘कुछ कुछ होता है’मधील या भूमिकेला ऐश्वर्याने दिला होता नकार
2 मानसी अनिकेतने केलं लग्न, काय असेल समरची पुढची चाल?
3 ‘दंगल’, ‘सिक्रेट सुपरस्टार’साठी दिली होती ऑडिशन आणि झाली ‘मिर्झापूर’ची ‘गोलू’
Just Now!
X