27 February 2021

News Flash

हार्दिक पांड्या आणि उर्वशी रौतेलामध्ये नेमकं काय शिजतंय?

याआधी हार्दिक आणि एली अवरामच्या 'सिक्रेट डेटिंग'च्या चर्चांनी जोर धरला होता.

हार्दिक पांड्या, उर्वशी रौतेला, कृणाल पांड्या

भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत होत्या. एकीकडे अभिनेत्री एली अवरामला तो डेट करत असल्याचे तर्कवितर्क लावले जात असतानाच आता त्याचं नाव अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत जोडलं जात आहे. नुकत्याच एका पार्टीत हार्दिक पांड्याला उर्वशीसोबत फ्लर्ट करताना पाहिलं गेलं.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार व्यावसायिक गौतम सिंघानियाच्या पार्टीमध्ये या दोघांची भेट झाली. पार्टीत ज्याप्रकारे हे दोघं एकमेकांशी बोलत होते, ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. या दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय, हाच प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे.

Bigg Boss Marathi: पहिली विकेट आरती सोलंकीची!

याआधी हार्दिक आणि एली अवरामच्या ‘सिक्रेट डेटिंग’च्या चर्चांनी जोर धरला होता. गेल्या वर्षी हार्दिकचा भाऊ कृणालचं लग्न झालं. त्यावेळी एलीने आवर्जून लग्नाला उपस्थिती लावली होती. तेव्हापासूनच या दोघांमध्ये नाते असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये एली सहभागी झाली होती. तेथूनच तिचं नाव प्रसिद्धीच्या झोतात आलं. मनिष पॉलसह एलीने ‘मिकी वायरस’ चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याचसह तिनं ‘किस किस को प्यार करू’, ‘नाम शबाना’, ‘हाऊसफुल्ल ३’, ‘पोस्टर बॉईज’ चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2018 2:17 pm

Web Title: hardik pandya spotted flirting with hate story 4 actress urvashi rautela
Next Stories
1 उमेशच्या जीवनात ‘तिचा’ नव्याने प्रवेश
2 VIDEO : राजेश खन्ना यांच्या गाण्यावर डिंपल कपाडियाने धरला ठेका
3 कठुआ बलात्कार प्रकरणातील बिग बींच्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर चिडली पूजा भट्ट
Just Now!
X