छोट्या पडद्यावरील लाडक्या आक्कासाहेब म्हणजेच अभिनेत्री हर्षदा खानविलकर लवकरच एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत ती सौंदर्या इनामदार ही भूमिका साकारणार आहे. या नव्या मालिकेत हर्षदाचा लूकही हटके असणार आहे.

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून सावळ्या रंगाची प्रतिभा पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे. वर्णभेदाविषयी असलेली मानसिकता बदलायला ही मालिका भाग पाडेल असे म्हटले जात आहे. याआधी हर्षदा खानविलकरची ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील आक्कासाहेबांची भूमिका प्रचंड गाजली. आक्कासाहेबांचा विशेष लूकसुद्धा चर्चेत होता. त्यामुळे आता ‘रंग माझा वेगळा’मध्ये त्यांचा लूक कसा असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024: केकेआरविरुद्ध ८३ धावांची खेळी करूनही विराट कोहली का होतोय ट्रोल? RCBचा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी

रंग माझा वेगळा या मालिकेतील त्यांच्या व्यक्तिरेखेविषयी सांगतना हर्षदा म्हणाल्या, ‘या भूमिकेसाठी मी प्रचंड उत्सुक आहे. पुढचं पाऊल या मालिकेने माझं विश्व बदललं. ३ वर्षांहून अधिक काळ मी ज्या वाहिनीसोबत काम केलं त्या स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना माहेरी आल्याची भावना आहे. माझं नव्याने आयुष्य सुरु होतंय असं म्हण्टलं तरी चालेल. सौंदर्या इनामदार नावाप्रमाणेच सौंदर्यावर प्रेम करणारी अत्यंत करारी अशी बिझनेस वुमन आहे. तुम्ही सुंदर असाल तर जगावर राज्य करु शकता हा विचार मानणारी आणि त्याप्रमाणे वागणारी अशी सौंदर्या. पुढचं पाऊलच्या अक्कासाहेबांवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं आता सौंदर्यावरही तितकंच प्रेम कराल हा आत्मविश्वास आहे.’

याआधी पुढचं पाऊल या मालिकेमधील हर्षदा यांच्या अक्कासाहेब या लूकची बरीच चर्चा होती. तमाम स्त्री वर्गात अक्कासाहेबांच्या साड्या, त्यांचे दागिने आणि खास करुन त्यांचे गजरे प्रसिद्ध होते. ‘रंग माझा वेगळा’ या आगामी मालिकेमधील त्यांचा लूकही हटके असणार आहे.

ही नवी मालिका ३० ऑक्टोबरपासून रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.