12 August 2020

News Flash

इलियाना डिक्रूझचं ब्रेकअप? सोशल मीडियावर केलं एकमेकांना अनफॉलो

इलियाना व अँड्र्यू गेल्या दहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

इलियाना डिक्रूझ

बॉलिवूडमध्ये हातावर मोजण्यात येतील असे कलाकार आहेत जे कधीच आपलं प्रेमसंबंध इतरांपासून लपवत नाहीत. त्यातच अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिचा समावेश होतो. आम्ही फार चांगले मित्र आहोत असे इतरांसारखे नेहमीचीच वाक्य ती सांगत नाही. इलियाना तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या ऑस्ट्रेलियन प्रियकर अँड्र्यू नीबोनचे फोटो नेहमीच शेअर करत असते. जवळपास गेल्या दहा वर्षांपासून हे दोघं एकत्र असून त्यांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मात्र सध्या या जोडीमध्ये सर्वकाही ठीक नसल्याचं दिसत आहे. इलियाना आणि अँड्र्यूने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं असून पेजवरील एकमेकांसोबत असलेले फोटोसुद्धा डिलीट केले आहेत.

‘स्पॉटबॉय इ’ने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांचं ब्रेकअप झालं असून ते एकमेकांशी बोलत नसल्याचं कळतंय. इलियानाचे इन्स्टाग्रामवरील स्टेटस पाहून ती ब्रेकअपला सामोरं जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. ‘जोपर्यंत तुम्ही ओझं खाली ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला ते ओझं असल्याचं कळत नाही,’ असं तिने एका पोस्टमध्ये म्हटलंय.

View this post on Instagram

#Repost @thegoodquote ♥️

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official) on

इलियानाला याआधी एका मुलाखतीत लग्नाबद्दल विचारलं असता ती म्हणाली होती, ”मला माहित नाही मी यावर काय उत्तर देऊ. सध्या माझं खासगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य चांगलं सुरू आहे. मला माझं खासगी आयुष्य सर्वांसमोर आणायचे नाही. त्यामुळे यावर जास्त न बोललेलंच बरं. माझ्या खासगी आयुष्याशिवायही जगाला दाखवण्यासाठी अनेक गोष्टी आहेत.” इलियानाने तिच्या बऱ्याच सोशल मीडियावरील पोस्टवर अँड्र्यूचा उल्लेख ‘हबी’ (पती) असा केला होता. त्यामुळे हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचंही म्हटलं जात होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 12:15 pm

Web Title: have ileana dcruz and andrew kneebone broken up couple unfollow and delete photos with each other ssv 92
Next Stories
1 ऐश्वर्या राय गरोदर असताना मधूर भांडारकर होता नैराश्यात!
2 Photo : ‘तारक मेहता…’मधील ‘ही’ अभिनेत्री होणार आई!
3 TOP 10 : ‘कबीर सिंग’पासून ‘मणिकर्णिका’पर्यंत ‘हे’ आहेत या वर्षातील हिट चित्रपट
Just Now!
X