दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात झालेल्या हल्लावर संपूर्ण देशात रोष व्यक्त केला जात आहे. विद्यापीठात झालेल्या तोडफोड प्रकरणाचा अनेक बॉलिवूड कलाकारांनी निषेध केला. आता मराठी कलाकार देखील सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांचा निषेध नोंदवत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक समीर विध्वंसनंतर आता अभिनेता हेमंत ढोमेने देखील निषेध व्यक्त केला आहे.

हेमंतने ट्विट करत हा निषेध नोंदवला आहे. त्याने ट्विटमध्ये कैफी आझमी यांचा शेर ‘शोर युँही ना परींदो ने मचाया होगा…कोई जंगल की तरफ ‘शहर’ से आया होगा! ‘ लिहित मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. हे ट्विट करत त्याने #JNUViolence हा हॅशटॅग देखील वापरला आहे. सध्या त्याचे हे ट्विट सोशल मीडिवर तुफान व्हायरल झाले आहे.

यापूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘आपल्या देशातील विद्यार्थ्यांना वाचवू शकत नाही आणि यांना दुसऱ्या देशातील अल्पसंख्याकांना संरक्षण द्यायचे आहे’ असे ट्विट केले होते. तसेच तिने ट्विटमध्ये #irony हा हॅशटॅग वापरत सरकारच्या धोरणांमधील विरोधाभासाला अधोरेखित केले.