मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर. दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारखे मराठी चित्रपट तर हंटर, गजनी, लव्ह सोनिया यांसारख्या हिंदी चित्रपटांनंतर आता सईने तिचा मोर्चा वेब सीरिजकडे वळवला आहे. ‘डेट विथ सई’ ही नवीन सीरिज ZEE5 लवकरच येणार असून त्याचा पहिला पोस्टर सईने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘डेट विथ सई’ या नावावरूनच वेब सीरिजची संकल्पना थोडीफार तुमच्या लक्षात आलीच असेल. सईचा एक चाहता कशाप्रकारे तिच्यावर सतत नजर ठेवतो आणि तिला कानोकान खबर न लागता कशाप्रकारे तिच्यावर चित्रपट निर्मिती करतो यावर ही वेब सीरिज आधारित आहे. त्या चित्रपट निर्मितीसाठी हा चाहता तिच्या आयुष्यात एकेक गोष्टी घडून आणतो. गमतीदार आणि तितक्याच रंजक पद्धतीने ही गोष्ट या सीरिजमध्ये मांडण्यात आली आहे. आता जेव्हा सईला या चाहत्याबद्दल समजतं तेव्हा काय घडतं हे या वेब सीरिजमधून पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Happily Terrified to announce the launch of my new show. After watching it I am sure you'll be terrified too, because #SomeoneIsWatching Always !! #DateWithSaie, coming soon, only on @ZEE5India
Written and Directed By – @dnyaneshzoting
Produced By – #PotadiEntertainment pic.twitter.com/CnrH9meg1A— Sai (@SaieTamhankar) November 19, 2018
येत्या ५ डिसेंबरपासून ZEE5 ही सीरिज प्रसारित होणार आहे. याविषयी सई म्हणते, ‘डेट विथ सईसाठी शूटिंग करण्याचा अनुभव अत्यंत आगळावेगळा होता. प्रसिद्धीचे काय परिणाम तुम्हाला भोगावे लागतात हे मला यातून समजलं. या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेतून मी पदार्पण करत आहे. प्रेक्षकांना हा प्रयोग नक्की आवडेल अशी अपेक्षा करते.’