30 November 2020

News Flash

‘ट्रोल करणं थांबवा अन्यथा…’; नेहासोबतचा तो व्हिडीओ पाहून हिमांश कोहली संतापला

हिमांश कोहलीचा एक्स गर्लफ्रेंड नेहा कक्करसोबतचा तो व्हिडीओ होतोय व्हायरल...

‘यारीया’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेला अभिनेता हिमांश कोहली सध्या बॉलिवूड गायिका नेहा कक्करमुळे चर्चेत आहे. हिमांश नेहाची माफी मागतोय असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अभिनेता संतापला आहे. अन् त्याने हा व्हिडीओ शेअर करण्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केला ‘बाथरुम सेल्फी’; काही तासांत मिळाले ६ लाख व्हूज

अलिकडेच नेहा कक्करनं रोहनप्रीत सिंहसोबत लग्न केलं. लग्नापूर्वी ती हिमांश कोहलीला देखील डेट करत होती. ते दोघे लग्न बंधनात अडकणार अशा चर्चाही होत्या. मात्र अंतर्गत मतभेदांमुळे दोघांचं ब्रेकअप झालं. त्यावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये थोडी एडिटिंग करुन हिमांश नेहाची माफी मागतोय असं दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे. “अशा प्रकारचे व्हिडीओ शेअर करुन कोणाला फायदा मिळतोय? अशा खोट्या व्हिडीओजवर सोशल मीडियाने बंदी घालायला हवी. समाजात नकारात्मकता पसरवणारे व्हिडीओ शेअर करणं थांबवा. अन्यथा मी कायदेशीर कारवाई करेन.” अशा आशयाची इन्स्टापोस्ट लिहून हिमांशने ट्रोलर्सला इशारा दिला आहे.

अवश्य पाहा – नखरे करणं अभिनेत्रीला पडलं भारी; १८ व्या दिवशी मालिकेतून काढून टाकलं

नेहा-रोहनप्रीतची प्यारवाली लव्हस्टोरी

नेहाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वत:च्या लव्हस्टोरी बद्दल सांगितलं. “आमच्या प्रेमाची सुरुवात झाली ती नेहा दा व्याह या गाण्याच्या शूटपासून. सेटवर बऱ्याच वेळा मी त्याचं निरीक्षण केलं, तो प्रत्येकाशी आदराने आणि नीट वागत-बोलत होता. त्यामुळे मी आतापर्यंत भेटलेल्या सगळ्या मुलांमध्ये मला तो जास्त क्यूट वाटत होता. त्याला पाहिलं की मला कायम असं वाटायचं हा फक्त माझा आहे”, असं नेहा म्हणाली. विशेष म्हणजे नेहाप्रमाणेच रोहनप्रीतनेदेखील त्याच्या प्रेमाची कबुली दिल्याचं तिने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 7:56 pm

Web Title: himansh kohli neha kakkar throwback video viral mppg 94
Next Stories
1 ‘..तर नितिश कुमार यांना भाजपाची बाहुली बनावं लागेल’; अभिनेत्याने व्यक्त केली भीती
2 शाहरुखने सांगितलं, ‘या’ कारणामुळे मी आणि अक्षय एकत्र काम नाही करु शकतं
3 नितीश कुमारांचा पराभव लांबणीवर पडतोय इतकंच, सत्ता आमचीच येणार-मनोज झा
Just Now!
X