‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या हिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘मालदीव व्हेकेशन’चे बरेच फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या फोटोंमधील बोल्ड अंदाज पाहून बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत असल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
बिकिनी, बॅकलेस असे अनेक बोल्ड फोटो हिनाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. मालदीवच्या निळ्याशार समुद्रकिनारी निवांत बसल्याच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. फक्त नेटकरीच नव्हे तर अमृता खानविलकर, मौनी रॉय, रवी दुबे, पार्थ समथान या सेलिब्रिटींनीसुद्धा हिनाच्या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
आणखी वाचा : परमीत सेठीशी लग्नाबाबत अर्चना पुरण सिंहने केला मोठा खुलासा
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षरा ही संस्कारी सूनेची भूमिका साकारल्यानंतर हिनाने चौकटीबाहेर जात ‘कसौटी जिंदगी की २’ मालिकेत ‘कोमोलिका’ ही नकारात्मक भूमिका साकारली. तिने ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.