News Flash

‘हाऊसफुल ४’ने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी रुपये

डोके बाजूला ठेवूनही बघायचा ठरवला तरी निदान विनोदी चित्रपट आहे म्हटल्यावर किमान हसता यावे, ही माफक अपेक्षाही चित्रपट पूर्ण करत नाही.

Housefull 4 box office collection Day : हाऊसफुल ४

प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी दिवाळीच्या मुहूर्तावर ‘हाऊसफुल ४’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. कलाकारांची फौज असलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या. पण डोके बाजूला ठेवूनही बघायचा ठरवला तरी निदान विनोदी चित्रपट आहे म्हटल्यावर किमान हसता यावे, ही माफक अपेक्षाही चित्रपट पूर्ण करत नाही. तरीही पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगलीच कमाई केली. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, ‘हाऊसफुल ४’ने प्रदर्शनाच्या दिवशी १८.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र येत्या दिवसांत हा आकडा कितपत वाढेल याबाबत शंका आहे.

फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल यांच्यासोबत क्रिती सनॉन, क्रिती खरबंदा आणि पूजा हेगडे यांच्या भूमिका आहेत. यापूर्वीच्या ‘हाऊसफुल’च्या कथानकांप्रमाणे इकडे ‘हाऊसफुल ४’मध्ये देखील नायकांना त्यांच्या-त्यांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करायचे आहे. पण, या लग्नात येणाऱ्या विघ्नावर हा संपूर्ण चित्रपट बेतलेला आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मुंबईत चित्रपटाने चांगली कमाई केली. मुंबईत जवळपास सहा कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला. तर गुजरातमध्ये दोन कोटींची कमाई केली.

जाणून घ्या, ‘हाऊसफुल’ फ्रँचाइसीमधल्या चित्रपटांची पहिल्या दिवसाची कमाई-

हाऊसफुल
प्रदर्शनाची तारीख- ३० एप्रिल २०१०
पहिल्या दिवसाची कमाई- ९.३२ कोटी रुपये
हाऊसफुल २
प्रदर्शनाची तारीख- ५ एप्रिल २०१२
पहिल्या दिवसाची कमाई- १२.१९ कोटी रुपये
हाऊसफुल ३
प्रदर्शनाची तारीख- ३ जून २०१६
पहिल्या दिवसाची कमाई- १५.२४ कोटी रुपये
हाऊसफुल ४
प्रदर्शनाची तारीख- २५ ऑक्टोबर २०१९
पहिल्या दिवसाची कमाई- १८.५० कोटी रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 1:31 pm

Web Title: housefull 4 box office collection day 1 the akshay kumar starrer records the best opening ssv 92
Next Stories
1 ‘अग्गंबाई सासूबाई’मधील आजोबांविषयी या रंजक गोष्टी माहितीयेत का?
2 ‘कलर्स मराठी अवॉर्ड’मध्ये ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेने मारली बाजी
3 Photo : मेकअपविना ‘या’ अभिनेत्रींना ओळखणंही आहे कठीण
Just Now!
X