करोना विषाणूमुळे ठप्प झालेली सिनेसृष्टी आता हळूहळू कार्यरत होत आहे. नियमांचं पालन करुन चित्रीकरणास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र सोशल डिस्टंसिंगच्या नियमांमुळे इंटिमेट सिन कसे शूट करणार? हा प्रश्न जगभरातील दिग्दर्शकांना पडला आहे. या प्रश्नाचं गंमतीशीर उत्तर अभिनेता अपारशक्ती खुराना याने दिलं आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करुन सर्वांनाच चकित केलं आहे.

अपारशक्तीचा आगामी चित्रपट ‘हेल्मेट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात अभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी प्रनुतन अपारशक्तीच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात दोघांचा एक रोमँटिक सीन आहे. हा सीन शूट करण्यासाठी दिग्दर्शकांनी चक्क फेस शिल्डचा वापर केला. हा फोटो अपारशक्तीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन इंटिमेट सीन शूट करताना सोशल डिस्टंसिंगचे नियम कसे पाळायचे? हे सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपारशक्तीने पोस्ट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे इतर चित्रपटांप्रमाणेच ‘हेल्मेट’ या चित्रपटालाही फटका बसला. खरं तर हा चित्रपट येत्या ऑगस्ट पर्यंत प्रदर्शित होईल अशी चर्चा होती. परंतु आता प्रदर्शनाची तारीख आणखी लांबवली गेली आहे. या चित्रपटात अपारशक्ती आणि प्रनूतन बहलसोबतच आशीष वर्मा, अभिषेक बनर्जी, अनुरिता झा असे अनेक नामांकित कलाकार झळकणार आहेत.