सलमान खानचा ‘रेस- ३’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. या सिनेमाने अवघ्या काही दिवसांमध्येच १०० कोटी रुपयांचा गल्ला कमावला. सिनेमात एकाहून एक सरस अॅक्शन सीन दाखवण्यात आली आहेत. या सीनपैकी एक सीन सध्या चांगलाच गाजत आहे तो म्हणजे जॅकलीन फर्नांडिस आणि डेजी शाह यांच्यातला अॅक्शन सीन. सिनेमात हा अॅक्शन सीन पाहताना फारच सोप्पा वाटतो. पण तसं अजिबातच नाहीये. या सीनसाठी ‘रेस- ३’ च्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतलीये.

यूट्यूबवर सलमान खान फिल्म्स या चॅनलवरून दोन्ही मुख्य अभिनेत्रींमधल्या फाइट सीनचा मेकिंग व्हिडिओ दाखवण्यात आला आहे. सिनेमातील या दृश्यात दोन्ही अभिनेत्रींमध्ये शाब्दिक बाचाबाची होते आणि त्या भांडू लागतात. या दृश्यासाठी जॅकलीन आणि डेजी दोघींनीही बरीच मेहनत घेतली होती. या दृश्याच्या चित्रीकरणावेळी खुद्द सलमानही तेथे उपस्थित होता. सलमाननेने या दृश्यासाठी जॅकलिनची मदतही केली होती.

prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Devmanus fame marathi actress Aishwarya Nagesh hosting ipl 2024
‘देवमाणूस’फेम ‘ही’ अभिनेत्री आता करतेय आयपीएलचे सूत्रसंचालन; जाणून घ्या…

सिनेमाच्या मेकिंगच्या या व्हिडिओमध्ये ‘रेस ३’ चा दिग्दर्शक रेमो डिसुझासुद्धा जॅकलिनची प्रशंसा करताना दिसत आहे. जॅकलिन खूपच मेहनती आहे. तर, डेझी प्रोफेशनल डान्सर असल्यामुळे अॅक्शन सीन्सवेळी तिच्या या कौशल्याचीही खूपच मत झाली, असं तो म्हणताना दिसतोय. यावेळी सलमान म्हणाला की, जॅकलीनने या सिनेमात वाघीणीसारखं काम केलं आहे. तर डेजीनेही या सिनेसाठी खूप मेहनत घेतली आहे.