18 November 2017

News Flash

हृतिकने घेतला सुझानसाठी घराजवळ फ्लॅट!

सुझान अंधेरीतील एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होती

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: May 19, 2017 7:47 PM

हृतिक रोशन आणि सुझान खान

हृतिक रोशन व त्याची पूर्वीश्रमिची पत्नी सुझान खान यांना वेगळं होऊन जवळपास दोन वर्षे उलटली आहेत. पण आजही ही दोघं अनेक ठिकाणी एकत्र फिरताना, मुलांसोबत वेळ घालवताना दिसतात. आजही या दोघांनी त्यांच्यातील मैत्रीच नाते जपले आहे. काही दिवसांपूर्वी हृतिकने एका मुलाखतीत सुझानबद्दलचे त्याचे प्रेम कमी न झाल्याचे त्याने अप्रत्यक्षपणे बोलून दाखवले होते. सुझानपासून विभक्त झाल्यानंतर मी आता लग्न करण्याच्या किंवा कुणालाही डेट करण्याच्या मनःस्थितीत नाहीये, असे त्याने सांगितले होते. सुझानही ऋतिकबद्दल चांगलं बोलतानाच दिसते. हृतिक अद्यापही तिचा चांगले मित्र असल्याचे तिने अनेक मुलाखतीत म्हटले आहे.

घटस्फोटानंतर रिहान व रिधान ही दोन्ही मुले आपल्या आईसोबत राहतात. पण हृतिकला या तिघांची कमतरता जरा जास्तच जाणवू लागली आहे असे म्हणावे लागेल. कारण आता हृतिकने या तिघांसाठी आपल्या घराजवळ एक फ्लॅट खरेदी केला आहे.

हृतिक अपर जुहूत राहतो. याच भागात त्याने एक फ्लॅट खरेदी केला आहे. हृतिकच्या घरापासून हा फ्लॅट केवळ १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. हृतिकचे आई वडील त्याच्या घरापासून खूप जवळ राहतात. सुझानचे आई वडीलही या भागात अगदी काही मिनिटांच्याच अंतरावर राहतात. केवळ सुझान हृतिकपासून वेगळी झाल्यावर अंधेरीतील एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होती. आता तीसुद्धा हृतिकच्या घराजवळ राहायला येणार असे दिसते. घटस्फोट झाल्यानंतरही आपली मुलं आणि पूर्वाश्रमीची पत्नी आपल्या जवळ राहावीत, असं हृतिकला वाटतेय, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

Eternal sunshine of the spotless mind… so so so proud of you.. 🌈🎶🌟❤😇 #kaabil #sacrecoeur

A post shared by Sussanne Khan (@suzkr) on

दरम्यान, हृतिकच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, हृतिक लवकरच कबीर खानच्या एका अ‍ॅक्शनपॅक्ट सिनेमात दिसणार आहे. ए. आर. मुरूगदास यांच्या ‘कत्थी’ सिनेमाच्या रिमेकसाठीही हृतिकचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.

First Published on May 19, 2017 7:47 pm

Web Title: hrithik roshan buys an apartment for ex wife sussanne khan in mumbai