करण जोहर दिग्दर्शित कभी खुशी कभी गम हा मल्टीस्टाटर चित्रपट एकेकाळी बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. आजही या चित्रपटाची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली दिसत नाही. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशनने शाहरुख खानच्या धाकट्या भावाची भूमिका साकरली होती. विशेष म्हणजे ही भूमिका चांगलीच गाजलीदेखील होती. मात्र, तरीदेखील या भूमिकेनंतर हृतिकने शाहरुखसोबत काम करण्यास नकार दिला होता.

‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ३ वर्षांनी त्याला ‘मैं हूं ना’ या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. फराह खानच्या या चित्रपटात त्याला शाहरुखच्या धाकट्या भावाच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, हृतिकने ही ऑफर नाकारली.


त्याकाळी हृतिकने त्याच्या भूमिकांकडे विशेष लक्ष केंद्रित केलं होतं. त्यामुळे त्याला मल्टीस्टारर चित्रपट किंवा सहकलाकाराची भूमिका करायची नव्हती. म्हणूनच त्याने ‘मैं हूं ना’ चित्रपटात शाहरुखच्या भावाची भूमिका करण्यास नकार दिला.

वाचा : ‘त्या’ दोन स्पर्धकांसाठी सुबोध भावेने लावली ‘इंडियन आयडॉल 2020’च्या मंचावर हजेरी

दरम्यान, हृतिकने नकार दिल्यानंतर ही भूमिका अभिनेता जायद खान याने साकारली. आ चित्रपटात शाहरुखसोबत सुष्मिता सेन, अमृता राव, किरण खेर, सतीश शाह, बोमन इराणी ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती.