‘गॅंग ऑफ वासेपूर’ फेम गर्ल हुमा कुरेशी ‘सुजाता’ लघुपटात मेकअपशिवाय व्यक्तिरेखा साकारताना सुरुवातीला काहीशी साशंक होती. ‘सुजाता’ हा लघुपट अनुराग कश्यपच्या ‘शॉर्टस्’ या लघुपटांच्या मालिकेतील एक असून, श्लोक शर्माने याचे दिग्दर्शन केले. कथानकाच्या गरजेनुसार हुमाने ही व्यक्तिरेखा मेकअपशिवाय सादर करणे आवश्यक होते. सुरवातीला साशंक असलेल्या हुमाने शेवटी मेकअपशिवाय भूमिका करण्याचा निर्णय घेतला. आपण मेकअपशिवाय पडद्यावर केसे दिसू, हे जाणून घ्यायची आता तिला उत्सुकता लागली आहे. दहा मिनिटाच्या या लघुपटाची कथा एन्नी जैदी यांनी लिहिली आहे. लहानपणी आपल्यावर अत्याचार करणा-यांविरोधात उभी राहणा-या तरूणीची ही कथा आहे. लॉस एंजिलिसमधील दहाव्या भारतीय चित्रपट महोत्सवात या लघुपटाच्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jul 2013 रोजी प्रकाशित
‘सुजाता’ चित्रपटात मेकअपशिवाय अभिनयाबाबत हुमा होती साशंक
'गॅंग ऑफ वासेपूर' फेम गर्ल हुमा कुरेशी 'सुजाता' लघुपटात मेकअपशिवाय व्यक्तिरेखा साकारताना सुरुवातीला काहीशी साशंक होती.

First published on: 08-07-2013 at 11:39 IST
TOPICSअनुराग कश्यपAnurag KashyapबॉलिवूडBollywoodहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinemaहुमा कुरेशीHuma Qureshi
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huma qureshi was apprehensive to go de glam for sujata