News Flash

“मी सलमानपेक्षाही मोठा सुपरस्टार”; केआरकेनं ट्विट केला पुरावा

केआरकेने सादर केलेला पुरावा पाहून तुम्ही देखील विचारात पडाल

अभिनेता कमाल खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर प्रतिक्रिया देत असतो. यावेळी त्याने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानवर निशाणा साधला आहे. मी सलमान पेक्षाही मोठा सुपस्टार आहे असं त्याने म्हटलं आहे. विशेष म्हणजे ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी त्याने एक पुरावा देखील सादर केला आहे. हा पुरावा पाहून तुम्ही देखील विचारात पडाल.

हा व्हिडीओ पाहाच – भारतीय संस्कृतीत गायीला इतकं महत्व का आहे?

कमाल खानने ‘देशद्रोही’ व ‘मेरीगोल्ड’ या दोन चित्रपटांची पोस्टर्स ट्विट केली आहेत. ‘देशद्रोही’मध्ये कमालने मुख्य व्यक्तीरेखा साकारली होती. तर ‘मेरीगोल्ड’मध्ये सलमान खानने. २००७-०८ मध्ये प्रदर्शित झालेले हे दोन्ही चित्रपट सुपरफ्लॉप होते. मात्र या फ्लॉप चित्रपटांची तुलना कमालने या ट्विटमध्ये केली आहे. ‘देशद्रोही’चा बजेट तीन कोटी होता तर ‘मेरीगोल्ड’चा २० कोटी. परंतु सलमानच्या चित्रपटापेक्षा जास्त कमाई ‘देशद्रोही’ या चित्रपटाने केली होती. या थक्क करणाऱ्या पुराव्याच्या आधारावर तो सलमान खान पेक्षा मोठा सुपरस्टार असल्याचा दावा त्याने केला आहे.

अवश्य पाहा – “अमित शाहांना धड खोटंही बोलता येत नाही”; ‘त्या’ व्हिडीओ क्लिपवरुन अभिनेत्याचा टोला

लक्षवेधी बाब म्हणजे त्याचा हा पुरावा नक्कीच विचार करण्याजोगा आहे. कारण सलमानला बॉलिवूडला सुपरस्टार म्हटले जाते. पण या शर्यतीत कमालने त्याला पछाडले होते. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही तासांमध्ये शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 7:25 pm

Web Title: i am bigger star than salman khan krk mppg 94
Next Stories
1 ‘कुली नंबर १’ला कोविड १९ चा फटका; वरुणने शेअर केलं पोस्टर
2 घरात करोनाग्रस्त रुग्ण सापडल्यावर काय केलं? जान्हवीने सांगितला क्वारंटाइनचा अनुभव
3 ‘तारक मेहता..’ मालिकेतून नट्टू काका होणार गायब?
Just Now!
X