08 December 2019

News Flash

‘प्रिया वारियरच्या लोकप्रियतेची मला ईर्षा नाही’

प्रिया आणि रोशन चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.

प्रिया आणि रोशन दोघंही 'ओरू आदार लव्ह' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.

गेल्या वर्षी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ क्लीपमुळे प्रिया प्रकाश वारियर ही नवोदीत अभिनेत्री रातोरात सुपरहिट ठरली. प्रियाला या व्हिडिओतून जितकी प्रसिद्धी मिळाली तेवढी प्रसिद्धी रोशन अब्दुल रहूफच्या वाट्याला मात्र आली नाही. असं असलं तरी आपल्याला प्रियाच्या लोकप्रियतेची ईर्षा वाटत नाही असं मोठ्या मनानं रोशननं कबुल केलं आहे.

प्रिया आणि रोशन दोघंही ‘ओरू आदार लव्ह’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी अनेक कारणामुळे चर्चेत आला. यातली गाणी , प्रिया रोशनची केमिस्ट्री प्रदर्शनापूर्वीच सोशल मीडियावर सुपरहिट ठरली. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रिया लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. मात्र रोशनच्या वाट्याला तेवढी प्रसिद्धी आली नाही. पण याबद्दल आपली कोणतीच तक्रार नसल्याचं रोशननं म्हटलं आहे.

‘प्रिया माझी खूप चांगली मैत्रीण आहे. ती एका रात्री लोकप्रिय झाली यावर माझा विश्वासच बसत नाही. पण तिच्या लोकप्रियतेबद्दल मला ना हेवा वाटत नाही ना ईर्ष्या. आम्ही दोघंही नवोदीत आहोत त्यामुळे आमच्यात तुलना, स्पर्धा कधीच नव्हती. तिचं नेहमीच चांगलं व्हावं हिच माझी सदिच्छा आहे’ अशी प्रतिक्रिया रोशननं दिली आहे.

First Published on February 11, 2019 3:30 pm

Web Title: i am not jealous of priya varrier popularity roshan abdul rahoof
Just Now!
X