News Flash

सोशल मीडिया तकलादू नाही- कतरिना कैफ

काही कलाकारांनी सोशल मीडियापासून नेहमीच चार हात लांब राहणं पसंत केलं आहे.

काही काळापूर्वीच कतरिना कैफ तिच्या फेसबुक अकाऊंटवर सक्रिय झाली होती.

सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया हे समीकरण म्हणजे चाहते आणि कलाकारांना जोडणारा एक दुवा. अनेक कलाकार त्यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन त्यांचे फोटो, आगामी चित्रपटाबाबतची माहिती आणि त्यांच्या जीवनातील काही मजेशीर प्रसंग शेअर करत असतात. कलाकारांच्या या ‘सोशल पोस्ट’ना चाहत्यांचीही दाद मिळते. बॉलिवूडचेही अनेक कलाकार त्यांच्या ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवर सक्रिय आहेत. पण या कलाकारांच्या यादीत काही कलाकार असेही आहेत ज्यांनी सोशल मीडियापासून नेहमीच चार हात लांब राहणं पसंत केलं आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे त्यापैकीच काही कलाकार.
काही काळापूर्वीच कतरिना कैफ तिच्या फेसबुक अकाऊंटवर सक्रिय झाली होती. त्यानंतर कतरिनाने तिच्या अकाऊंटवरुन अनेक पोस्ट करण्यास सुरुवातही केली. अवघ्या काही काळातच कतरिनाला अनेक जणांनी फॉलो केले. स्वत:च्या खासगी जीवनाविषयी माध्यमांसमोर नेहमीच कमी व्यक्त होणाऱ्या कतरिनाने नुकतेच तिचे सोशल मीडियाविषयीचे मत व्यक्त केले आहे. ‘काही गोष्टी संरक्षित राखण्याचा माझा स्वभावच आहे. सध्याच्या घडीला मी फेसबुकचा वापर करतेय, आणि माझं असं मत आहे की हे माध्यम तकलादू नाही. हे एक चांगले माध्यम आहे,’ असे ती म्हणाली.
सोशल मीडियावर कतरिना फारशी सक्रिय नसली तरीही इथे तिची चर्चा मात्र नेहमीच होत असते. सध्या कतरिना तिच्या ‘बार बार देखो’ या चित्रपटाद्वारे रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना यांच्यातील केमिस्ट्री पाहण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे. ‘बार बार देखो’ या चित्रपटातील कतरिनाच्या नव्या लूकची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 12:44 pm

Web Title: i realise that social media is not that intrusive katrina kaif
Next Stories
1 ‘कोलावरी’ धनुषचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण..
2 ‘आशिकी ३’साठी सिद्धार्थ-आलिया
3 सलमानच्या तोंडून ऐश्वर्याची तारीफ
Just Now!
X