बॉलिवुड अभिनेता सोनू सूद यानं गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात केलेलं मदतकार्य आख्ख्या देशानं पाहिलं. मग ते स्थलांतर करणाऱ्या मजुरांसाठी असो किंवा लॉकडाउनमुळे पोटाला उपवास घडणाऱ्या गरजूंसाठी असो, सोनू सूद या हजारो लाखो नागरिकांना मदत करताना दिसून आला आहे. आता ट्विटरवर #IstandWithSonuSood हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. पण नेमका हा हॅशटॅग का ट्रेंड होतच चला जाणून घेऊया..

बुधवारी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद संबंधित ६ मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्यात त्याच्या धर्मादाय कार्यालयाचा समावेश आहे. त्यानंतर आज सकाळी आयकर विभागाचे काही अधिकारी पुन्हा सोनू सूदच्या मुंबईतील घरी चौकशीसाठी पोहोचले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी सोनू सूदला पाठिंबा दिला आहे. ट्विटरवर #IstandWithSonuSood हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार, आयकर विभागाचे पथक सोनू सूदच्या लखनऊमधील एका रिअल इस्टेट कंपनीशी केलेल्या कराराची चौकशी करत आहे. मात्र, आतापर्यंत या प्रकरणावर कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेले नाही. करोना काळात टाळेबंदीमध्ये गरजू लोकांना आर्थिक मदत करणारा, त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी सहकार्य करणारा अभिनेता सोनू सूदच्या मालमत्तेची पाहणी प्राप्तिकर विभागाने सुरू केली आहे. बुधवारी सोनू सूदच्या कार्यालयासह त्याच्याशी संबंधित सहा कंपन्यांची प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. सोनू सूदच्या कार्यालयात आर्थिक देवाणघेवाणीत अफरातफर झाल्याचे समजल्यामुळे ही पाहणी केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती.

आयकर विभाग सोनू सूदच्या मुंबईतील घरी पोहोचताच ट्विटर द्वारे चाहत्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. अनेकांनी ट्वीट करत ‘आमचा तुला पाठिंबा आहे’ असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने ‘लॉकडाउनमध्ये सोनू सूदने गरजूंना मदत केली आहे. तो खरा हिरो आहे. त्याच्यासारखे आणखी काही हिरो जन्माला येऊ देत’ असे म्हटले आहे.

एनडीटीव्हीने सोनू सूदच्या बाबतीत चालू असलेल्या आयकर विभागाच्या तपासावर दिलेल्या अहवालानुसार, सोनू सूद आणि लखनऊ बेस्ट रिअल इस्टेट फर्म यांच्यात झालेला कराराबाबत आयकर विभाग तपास करत आहे. या करारात करचुकवेगिरीच्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या तपासाला ‘सर्वे’ म्हटले जात आहे.