26 February 2021

News Flash

सलमानच्या घरातील ‘या’ सदस्यावर बायोपिक व्हावा -नोरा फतेही

हेलन यांच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार व्हावी अशी इच्छा असल्याचं म्हटलं आहे.

नोरा फतेही

‘बाहुबली’ या चित्रपटातील ‘मनोहारी’ या गाण्यात अप्रतिम नृत्य सादर करणारी अभिनेत्री मॉडेल नोरा फतेही लवकरच आगामी भारत चित्रपटामध्ये झळकणार आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली. या चित्रपटामध्ये सलमान खानमुळे नोराची वर्णी लागल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने नुकतंच तिचं मत मांडलं असून सलमानच्या घरातील एका व्यक्तीवर बायोपिक तयार व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

‘नवभारत टाईम्स’नुसार, नोरा सध्या ‘माय बर्थ डे सॉन्स’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी तिला काही प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांना उत्तर देताना तिला हेलन यांच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार व्हावी अशी इच्छा असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे तिला या बोयपिकमध्ये झळकायला आवडेल असंही तिने यावेळी सांगितलं.

‘भविष्यात कधी हेलन यांच्यावर बायोपिकची निर्मिती करण्यात आली. तर मला त्या बायोपिकमध्ये झळकायला आवडेल. हेलन एक अभिनेत्री म्हणून माझ्या आदर्श आहेत. त्यामुळेच मी अनेक वेळा माझ्या नृत्यामध्ये त्यांच्या डान्सस्टेपसचा समावेश करत असते, असं ती म्हणाली.
पुढे ती असंही म्हणाली, हेलन यांनी काम केलेला प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला आहे. त्यांचं नृत्याप्रमाणे अभिनयावरही प्रभुत्व आहे. त्यामुळे मी त्यांना आदर्श मानते. अनेक वेळा मी घरी एकटी असताना त्यांची गाणी ऐकते’.

दरम्यान, ‘हेलन यांच्याप्रमाणे मी बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचे अभिनय पाहून शिकण्याचा प्रयत्न करत असते. कंगणा रणावत, दीपिका पदुकोण,विद्या बालन यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत’. सध्या नोरा सलमानच्या भारत चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असून चित्रपटाची संपूर्ण टीम माल्टामध्ये पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 2:08 pm

Web Title: i want to do biopic of helan ji syas nora fatehi
Next Stories
1 लक्ष्यामुळे विजू मामा झाले ‘मोरूची मावशी’ !
2 बोल्ड फोटोशूट करणं अमिषाला पडलं महागात
3 ‘या’ कारणामुळे कंगना राहणार अविवाहित?
Just Now!
X