News Flash

”तो माझ्या आयुष्यातला सर्वांत वाईट काळ”; ब्रेकअपबद्दल परिणीतीचा खुलासा

प्रेमसंबंधावर परिणीती पहिल्यांदाच मोकळेपणाने व्यक्त झाली.

परिणीती चोप्रा

बॉलिवूड कलाकारांच्या ब्रेकअप आणि अफेअरच्या अनेक चर्चा ऐकायला मिळतात. पण अभिनेत्री परिणीती चोप्राच्या प्रेमप्रकरणाबाबत कधीच फारशी चर्चा झाली नाही. मुलाखतींमध्ये रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारल्यावरही ती मौनच बाळगणं पसंत करते. परिणीती दिग्दर्शक मनीष शर्माला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. या ब्रेकअपबद्दल पहिल्यांदाच तिने खुलासा केला आहे.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, ‘माझा एकदाच प्रेमभंग झाला आणि कदाचित पुन्हा माझ्यासोबत तसं काही घडणार नाही. प्रामाणिकपणे बोलायचे झाल्यास, मी फार गोंधळलेली होती. तो माझ्या आयुष्यातला सर्वांत वाईट काळ होता. कारण नकार पचवणं काय असतं हे मला माहितच नव्हतं. पण या ब्रेकअपमुळे माझ्यात बराच सामंजस्यपणा आला. त्यासाठी मी देवाचे खूप आभार मानते.’

आणखी वाचा : रेणुका शहाणेंच्या सोशल मीडियावर व्यक्त होण्यावर पती आशुतोष राणा म्हणतात.. 

परिणीतीने ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटाच्यावेळी मनीषसोबत काम केलं होतं. मनीष या चित्रपटाचा दिग्दर्शक होता. आता परिणीती चरित देसाईला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र यावर काहीही बोलण्यास तिने नकार दिला.

परिणीती लवकरच ‘जबरियाँ जोडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रशांत सिंग दिग्दर्शित या चित्रपटात परिणीतीसोबत सिद्धार्थ मल्होत्राची मुख्य भूमिका आहे. येत्या ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 3:56 pm

Web Title: i was a mess it was the worst time in my life says parineeti chopra on heartbreak ssv 92
Next Stories
1 लक्ष्मी-नारायण यांचा अलौकिक विवाह सोहळा!
2 ‘क्रिश ४’ कधी प्रदर्शित होणार, हृतिक रोशन म्हणतो…
3 Sacred Games 2 : “पार्लमेंट अपने बाप का है” का म्हणतोय गणेश गायतोंडे?
Just Now!
X