बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या लग्नाच्या बातम्यांनी सध्या बॉलीवूड वर्तुळात जोर धरला आहे. त्याची कथित प्रेयसी लुलिया वेंतुर सोबत सलमान यंदाच्या वर्षा अखेरीस लग्न करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये आहेत. सलमानने या बातम्यांवर प्रतिक्रिया देखील दिली नव्हती. अखेर आज सलमानने आपले मौन सोडले. आयआयएफएच्या पत्रकार परिषदेत बोलत असताना सलमानने आपल्या लग्नाबाबतच्या बातम्यांवर स्पष्टीकरण दिले. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी लग्न करेन, असे सलमानने सांगितले. लुलिया वेंतुरसोबतच्या नात्याबद्दल सलमानला विचारले तो म्हणाली की, तो माझा वैयक्तीक विषय आहे. माझी इच्छा असेल तेव्हा मी लग्न करेन. मी केव्हा लग्न करतोय हे मला तुम्हाला सांगायची गरज वाटत नाही. पण मी माझ्या चाहत्यांच्या माहितीसाठी माझ्या लग्नाबाबतची माहिती मी माझ्या फेसबुक किंवा ट्विटर अकाऊंटवर नक्की पोस्ट करेन.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सलमान आणि लुलिया अनेकदा एकत्र दिसून आले आहेत. लुलिया सलमानच्या कुटुंबियांसोबत देखील त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात अनेकदा उपस्थित होती. सलमान त्याच्या वाढदिवशी लुलियासोबत विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा सध्या बॉलीवूड वर्तुळात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th May 2016 रोजी प्रकाशित
जेव्हा माझी इच्छा असेल तेव्हा लग्न करेन- सलमान खान
सलमान यंदाच्या वर्षा अखेरीस लग्न करणार असल्याच्या बातम्या
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड

First published on: 20-05-2016 at 19:40 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will get married when i want to says salman khan