News Flash

अनुराग कश्यप, तापसी पन्नूविरोधात आयकरची छापेमारी; मुंबईतील मालमत्तांची झाडाझडती

पुण्यातील मालमत्तांवरही छापे

मुंबईतील मालमत्तांवर आयकरच्या धाडी. (संग्रहित छायाचित्र)

सोशल मीडियातून भूमिका मांडणाऱ्या व सातत्यानं चर्चेत असलेल्या प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्याविरोधात आयकर विभागाने आज धाडसत्र सुरू केली. आयकर विभागाच्या पथकांनी अनुराग कश्यप आणि तापसीच्या मुंबईतील मालमत्तावर छापे टाकत झाडाझडती सुरू केली आहे. अनुराग आणि तापसी बरोबरच विकास बहल आणि मधु मंटेना यांच्या घरीही आयकरने छापे टाकल्याचं वृत्त आहे.

आयकर विभागाने बुधवारी दुपारी अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूच्या मालमत्तांवर छापे मारले. ‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही छापे मारण्यात आले. कर चुकवल्याच्या आरोपाखाली हे छापे टाकण्यात आले असून, मुंबईतील तब्बल २२ ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे. यात फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर आयकरने धाडी टाकल्या.

‘फँटम फिल्म’ आणि क्वान या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांवर हे छापे टाकण्यात आले. त्यांनी कर चोरी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. या कर चोरी प्रकरणाचा तपास सुरू असल्याचंही आयकरनं म्हटलं आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचं वितरण करण्याचं काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी २०११मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी २०१८ मध्ये बंद करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 1:09 pm

Web Title: income tax department it raids at actress taapsee pannu and anurag kashyap homes bmh 90
Next Stories
1 ‘मालिका ही एका कलाकाराची नाही’, दयाबेनच्या वापसीवर अंजली भाभी म्हणाली
2 अनुष्काने शेअर केला खास फोटो, वामिकासोबत अनुष्का पोहचली ‘या’ ठिकाणी
3 …..म्हणून आमिरने लावला ‘महाभारत’ला ब्रेक!
Just Now!
X