News Flash

आदिपुरुष चित्रपटात अजय देवगण दिसणार ‘या’ भूमिकेत?

या चित्रपटात सैफ आणि प्रभास मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा सुपरहिट ठरल्यानंतर त्यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. आता या चित्रपटात अभिनेता अजय देवगण देखील भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अजय देवगण ‘आदिपुरुष’ या चित्रपटात भगवान शंकराची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत अजय देवगण किंवा चित्रपट निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

काही दिवसांपूर्वी प्रभासने ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची घोषणा केली. त्यानंतर हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. प्रभास, सैफ आणि अजयला एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहे. आता या चित्रपटासाठी निर्मात्यांनी अभिनेत्री कियारा अडवाणीला विचारले असल्याच्या चर्चा रंगल्या आहे.

काही दिवसांपूर्वी ओम राऊत यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. हा चित्रपट श्रीरामचंद्रावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटात प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे तर सैफ रावणाची भूमिका साकारणार आहे. तसेच हा चित्रपट 3D अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षाकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 1:00 pm

Web Title: is ajay devgn to play lord shiva in adipurush avb 95
Next Stories
1 काजल अगरवालच्या साखरपुड्याचा फोटो; होणाऱ्या पतीने केला पोस्ट
2 धोनीच्या मुलीला धमकी देणाऱ्याला अटक; आर. माधवनने केली कठोर शिक्षेची मागणी
3 फोटोतील ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? आज आहे लोकप्रिय क्रिकेटपटूची पत्नी
Just Now!
X