News Flash

सुष्मिता- रोहमनच्या नात्यात का रे दुरावा ?

सुष्मिताने रोहमनला सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे

सुष्मिता सेन, रोहमन शॉल

बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या मॉडेल रोहमन शॉलला डेट करत आहे. सुष्मिताने स्वत: इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या नात्याची कबुली दिली होती. सुष्मिताने एक फोटो पोस्ट करत या नात्याचा खुलासा केला होता. तेव्हापासून सुष्मिताच्या सोशल अकाऊंटवर त्या दोघांचे अनेक फोटो शेअर करत असते. एका मुलाखतीमध्ये तिने त्यांची लव्हस्टोरीही सांगितली होती. तेव्हापासून ही जोडी सतत चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच आता या दोघांविषयी नवीन चर्चा रंगली आहे. या दोघांचे वाद झाल्याचं दिसून येत आहे. रोहमने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केलेल्या काही पोस्टमुळे या दोघांचं बिनसल्याचं पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सुष्मिता अनेक वेळा रोहमन आणि आपल्या लेकींसोबतचे फोटो शेअर करत असते. त्यासोबतच ती अनेक पोस्टमध्ये रोहमनला टॅगही करत असते. मात्र काही दिवसांपूर्वीच सुष्मिताने रोहमनला सोशल मीडियावर फॉलो करणं बंद केलं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये खटके उडत असून ते वेगळे झाल्याची चर्चा रंगत आहे.

रोहमनने इन्स्टाग्राम स्टोरीमधून आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे. त्याने त्याचे विचार आणि भावना या स्टोरीमधून मांडल्या आहेत. त्याने एकाच वेळी चार पोस्ट लिहिल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये त्याने “हे यू, मी तुझ्याशी बोलत आहे. अशी कोणती गोष्ट आहे, ज्याचा तुला त्रास होतोय,प्लीज मला सांग मी तुझं सारं काही मनापासून ऐकून. २४ तास,” असं त्याने म्हटलं आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये “तुम्हाला वाटतं की, नातं टिकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता आणि तुमचा जोडीदार मात्र काहीच करत नाही. मात्र ही गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे की, तुम्ही जे काही करता तो तुमच्या निर्णय आहे. तुम्ही तसं करावं ही तुमच्या जोडीदाराची अपेक्षा नसते. त्यामुळे तुम्हाला मनापासून वाटेल त्याच गोष्टी करा. अपेक्षा ठेऊन कोणती गोष्ट करु नका”, असं म्हटलं आहे.

रोहमननं पुढे लिहीलं, तुम्ही जोडीदाराला जशी वागणूक देता तशीच त्यानेही तुम्हाला द्यावी, कारण तुम्ही त्या नात्यामध्ये आहात. जर तुमचा जोडीदार तुम्हाला वाईट वागणूक देत असेल आणि तरी तुम्ही त्याच्यासोबत आहात . तर ती तुमची चूक आहे. त्यामुळे स्वत: वर प्रेम करायला शिका.” विशेष म्हणजे चौथ्या पोस्टमध्ये तो भावूक झाला आहे. तुम्ही एकटं राहुन कंटाळता का ? ठीक आहे. जेव्हा तुम्ही स्वत:ला आनंदी ठेऊ शकत नाही. मग तुम्ही अशी आशा का करता की तुमचा जोडीदार तुम्हाला इंटरेस्टिंग समजेल. रोज टीव्ही, फोन, पुस्तकं याच्याव्यतिरिक्त १५ ते २० मिनिटे स्वतःशी बोला. स्वतःचा आवाज ऐका तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तर मिळतील.

दरम्यान, रोहमन आणि सुष्मितामध्ये सध्या कोल्ड वॉर सुरु असल्याचं एकंदरीतच दिसून येत आहे. सुष्मिता आणि रोहमन यांच्या वयात १५ वर्षांचं अंतर आहे. यापूर्वी सुष्मिता हॉटेल क्षेत्रातील उद्योग सम्राट रितिक भसिनला डेट करत होती, मात्र सुष्मिता रितिकचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. रितिक बरोबरच सुष्मिताचं नाव रणदीप हुडा सोबतही जोडलं गेलं. मात्र हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 12:50 pm

Web Title: is all not so well between sushmita sen rohman shawll ssj 93
Next Stories
1 तुषारसोबत भांडण झाल्यानंतर एकता कपूरने थेट पोलिसांना लावला फोन
2 ‘दोस्ताना २’मध्ये पहिल्यांदाच जमणार जान्हवी-कार्तिकची जोडी
3 अवघे काही किलो वजन वाढल्यामुळे मी गमावली ‘ती’ भूमिका, राधिकाची खंत
Just Now!
X