News Flash

अनिल कपूरचा मुलगा ‘या’ स्टारकिडला करतोय डेट?

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हर्षवर्धन कपूर

बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सबाबत नेहमीच चर्चा असते. त्यांचा लूक, फॅशन सेन्स इथपासून ते कोणाला डेट करत आहेत याबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. सध्या सोशल मीडियावर अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरचीच चर्चा पाहायला मिळतेय. याचं कारण म्हणजे अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आणि इन्स्टाग्राम सेन्सेशन आलियासोबत हर्षवर्धनचे व्हायरल झालेले काही फोटो. हे फोटो पाहून हर्षवर्धन आणि आलियामध्ये नेमंक काय शिजतंय, हाच प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

मुंबईतील जुहू येथील एका कॅफेमधून बाहेर पडताना या दोघांना एकत्र पाहिलं गेलं. हर्षवर्धन आणि आलियाचे कॅफेतून बाहेर पडतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यावेळी दोघंही कॅज्युअल लूकमध्ये होते. इन्स्टाग्रामवर आलियाचे बरेच फॉलोअर्स असून ती नेहमी बोल्ड आणि हॉट फोटो पोस्ट करताना दिसते. तिचा हा अंदाज एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

pooja bedi daughter aalia पूजा बेदीची मुलगी आलिया

AIB roast row: रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरला मुंबई हायकोर्टाचा दिलासा नाहीच

‘मिर्झिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला हर्षवर्धन याआधी सैफ अली खानची मुलगी सारा अली खानला डेट करत असल्याची चर्चा होती. रिहा चक्रवर्तीसोबत देखील हर्षवर्धनचं नाव जोडलं गेलं होतं.

हर्षवर्धनच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच अभिनव बिंद्राच्या बायोपिकमध्ये आपल्या वडिलांसोबत भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 2:36 pm

Web Title: is anil kapoor son harshvardhan kapoor dating pooja bedi daughter aalia
Next Stories
1 AIB roast row: रणवीर सिंग, अर्जुन कपूरला मुंबई हायकोर्टाचा दिलासा नाहीच
2 पाकिस्ताननं लुडबूड करणं थांबवावं, मधुर भांडारकरने आफ्रिदीला सुनावले खडे बोल
3 IPLच्या उद्घाटन सोहळ्यात ‘या’ व्यक्तीच्या इशाऱ्यावर नाचणार हृतिक
Just Now!
X