01 October 2020

News Flash

माझ्या मुलाचा सांभाळ मी एकटीच करतेय, मलायकाने सलमानला सुनावले

सलमान खान आणि मलायका अरोरा नुकतेच एका पुरस्कार सोहळ्यात भेटले होते

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान (संग्रहित)

गेल्या काही दिवसांपासून अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटासंदर्भात सुरू असणारी चर्चा अखेर खरी ठरण्याची शक्यता आहे. ‘मुंबई मिरर’ या दैनिकाच्या वृत्तानुसार, मलायका लवकरच मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत सलमान खानने अरबाज आणि मलायकामध्ये समेट घडवून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, मलायकाचा घटस्फोटाचा निर्णय अंतिम असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मलायका अरबाजपासून वेगळी खारमधील भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत आहे.
दोघात तिसरा आता सगळं विसरा 
सलमान खान आणि मलायका अरोरा नुकतेच एका पुरस्कार सोहळ्यात भेटले होते. यावेळी दोघेजण एकमेकांशी चांगल्या पद्धतीने बोलत होते. इतकेच नव्हे तर सलमान मलायकाशी खासगीत बोलता यावे, यासाठी तिला ग्रीन रूममध्येही घेऊन गेला होता. यावेळी मलायकाने मी एकटीच आमचा मुलगा अरहानचा सांभाळ करत असल्याचे सलमानला सांगितले. मलायकाच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ती लवकरच न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल करेल. मात्र, सलमानला अरबाज आणि मलायकाचे नाते कायम रहावे, असे वाटत आहे. तर अरबाजचे आई-वडील सलीम आणि सलमा खान यांनी याबाबतचा निर्णय अरबाज आणि मलायकावरच सोडला आहे.
सलमानच्या ‘खान’दानात चाललंय तरी काय? 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2016 3:23 pm

Web Title: is malaika arora khan finally divorcing arbaaz khan
Next Stories
1 करिनाच्या गाण्यावर शबाना आझमी भडकल्या
2 शेलारमामा चषक: कबड्डीसाठी सुशांत शेलारचा पुढाकार
3 ‘सत्यमेव जयते’विरुद्ध जनहित याचिका दाखल; आमिरला उत्तर देण्याचे निर्देश
Just Now!
X