News Flash

ऋषी कपूर यांचं ट्विट रणबीर- आलियाच्या नात्यासंबंधी तर नाहीये ना?

आलिया आणि ऋषी कपूर यांच्यात ट्विटरवर झालेल्या या संवादाला अनेकांनीच रणबीर आणि आलियाच्या बहुचर्चित रिलेशनशिपची जोड देण्यास सुरुवात केली.

रणबीर कपूर, आलिया भट्ट, ऋषी कपूर

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘राजी’ या चित्रपटातील अभिनयासाछी प्रचंड चर्चेत आली आहे. तिच्या अभिनयाची अनेकांनीच प्रशंसाही केल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर आलियाची प्रशंसा करणाऱ्या ट्विटची चर्चा सुरु असतानाच ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या एका ट्विटमुळे मात्र वेगळ्याच विषयाला तोंड फुटलं आहे. तो विषय म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या रिलेशनशिपची पुढची पायरी, अर्थात लग्न…

सोशल मीडिया आणि मुख्य म्हणजे ट्विटरवर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या ऋषी कपूर यांनी एक ट्विट केलं. ज्यामध्ये त्यांनी भट्ट कुटुंबियांसोबत काम करण्याचा आनंद व्यक्त केला. ‘मी सर्वाधिक कलागुणसंपन्न अशा भट्ट कुटुंबासोबत आणि (त्यांच्या नातेवाईकांसोबत) काम केलं आहे. महेश भट्ट, मुकेश भट्ट, रॉबिन भट्ट, पूर्णिमा जी, सोनी भट्ट, पूजा भट्ट, इमरान हाश्मी, आलिया भट्ट… तुम्हा सर्वांचेच आभार’, असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं. आलियानेही त्यांच्या या ट्विटला उत्तर देत येत्या काळातही त्यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची इच्छा व्यक्त केली.

वाचा : प्रवासखर्च कमी करण्याच्या सोप्या टिप्स

आलिया आणि ऋषी कपूर यांच्यात ट्विटरवर झालेल्या या संवादाला अनेकांनीच रणबीर आणि आलियाच्या बहुचर्चित रिलेशनशिपची जोड देण्यास सुरुवात केली. कोणी म्हणतंय की खुद्द ऋषी कपूरच या ट्विटच्या माध्यमातून काहीतरही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, कोणी म्हणतंय की आलिया भट्टला आलिया कपूरच्या रुपात पाहण्यासाठी रणबीरचे बाबा म्हणजेच अभिनेता ऋषी कपूरही तयार आहेत. नेटकऱ्यांच्या या प्रतिक्रिया पाहता ऋषी कपूर यांचा राग अनावर झाला नाही म्हणजे मिळवलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 1:43 pm

Web Title: is rishi kapoor confirming that he is ready to see alia bhatt as alia kapoor ranbir kapoors bae
Next Stories
1 Video: जॅकलिन फर्नांडिसनेही उडवली डेजी शहाची खिल्ली
2 ‘लवरात्री’वर विश्वहिंदू परिषदेचा आक्षेप, सलमान अडचणीत?
3 प्रियांका चोप्राच्या ‘या’ हिल्सची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
Just Now!
X