News Flash

वाढदिवशी चाहत्यांच्या प्रेमाचा परतावा करण्याचा श्रुतीचा छोटासा प्रयत्न

अभिनेत्री श्रुती हसन बुधवारी आपला २९वा वाढदिवस साजरा करीत असून, यावेळचा वाढदिवस सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांबरोबर अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे तिने योजले आहे.

| January 27, 2015 02:41 am

अभिनेत्री श्रुती हसन बुधवारी आपला २९वा वाढदिवस साजरा करीत असून, यावेळचा वाढदिवस सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांबरोबर अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे तिने योजले आहे. चाहत्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीची सविस्तर माहिती छायाचित्रासकट सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे आवाहन तिने चाहत्यांना केले आहे. तिच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्याच्या आयुष्यात चांगला बदल घडविणारे कार्य करण्यावर श्रुतीचा नेहमी विश्वास राहिला आहे. तिच्या या विचारांमुळेच यावेळच्या वाढदिवशी तिने हा खास ऑनलाईल उपक्रम राबविला आहे. चाहत्यांनी अलीकडेच केलेल्या चांगल्या कामगिरीची माहिती छायाचित्रासकट सोशल मीडियाद्वारे तिला पाठविण्याचे आवाहन तिने चाहत्यांना केले आहे. यातून उत्कृष्ट पाच जणांची निवड करून श्रुती हसनची स्वाक्षरी असलेल्या भेटवस्तू तिच्या खास संदेशासह या निवडक पाच जणांना पाठविण्यात येणार असल्याची माहितीदेखील तिच्या जवळच्या सूत्रांकडून मिळाली.
‘रॉकी हॅंडसम’, ‘वेलकम बॅक’, ‘मैं गब्बर’, ‘यारा’ आणि महेश बाबूंबरोबरच्या एका अनाम तेलगू चित्रपटात ती दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2015 2:41 am

Web Title: is shruti haasans turn to give back to fans
Next Stories
1 जॅकलिन साकारणार अझरुद्दीनची बेगम?
2 सगळे टाळ्या वाजवणार?
3 सीआयडीचे शिलेदार
Just Now!
X