News Flash

रणबीर-कतरिनाचा ‘ब्रेकअप’?

रणबीरची दीपिकाशी वाढती जवळीक ही रणबीर-कतरिनाच्या नात्याआड येत आहे.

सध्या रणबीर लंडनमध्ये 'ए दिल है मुश्किल' चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. तर कतरिना आपल्या कुटुंबासमवेत ख्रिसमस साजरा करण्यासाठी लंडनला तिच्या घरी गेली आहे.

बॉलीवूड कलाकार आणि त्यांची प्रेमप्रकरण ही नेहमीच चर्चेचा विषय असतात. कोणी आपल्या प्रेमासह विवाहबंधनात अडकून आनंदात संसार करतात तर कोणाचे प्रेम काही महिनेसुद्ध टीकत नाही. अगदी त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या सुरुवातीपासून ते वेगळे होईपर्यंत या सेलिब्रेटींची ‘लव्ह लाइफ’ चांगलीच चर्चेत राहते. अशीच चर्चेतील जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि कतरिना कैफ. पण आता ही जोडी एकत्र राहणार नसल्याचे कळते.
सूत्रांनुसार, रणबीरची दीपिकाशी वाढती जवळीक ही रणबीर-कतरिनाच्या नात्याआड येत आहे. नुकतीच ‘तमाशा’ चित्रपटाच्या यशाची पार्टी साजरी करण्यात आली होती. त्यालाही कतरिना उपस्थित नव्हती. तसेच, दीपिकाच्या समोर जाणेही कतरिना टाळत असल्याचे सूत्रांकडून कळते. ‘तमाशा’ चित्रपटानंतर दीपिका-रणबीरबद्दल होत असलेल्या चर्चांमुळे कतरिना व्यथित झाली आहे. असे असतानाही कतरिना आपल्या नात्याला सांभाळण्याच्या प्रयत्नात असून, रणबीरशी बोलून ती यावर चर्चा करणार आहे. मिड-डेमध्ये देण्यात आलेल्या वृत्तानुसार, कतरिना अजूनही तिचे नाते सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. ती लवकरात लवकर रणबीरसोबत कुठेतरी बाहेर जाण्याच्या विचारात असल्याचे आपल्या मित्रमंडळींना सांगत आहे. आपल्या कुटुंबासमवेत ख्रिसमस साजरा केल्यानंतर कतरिना आइसलँडला जाणार असून, रणबीर सरळ तिला तेथेच जाऊन भेटेल.
सध्या रणबीर लंडनमध्ये ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. तर कतरिना आपल्या कुटुंबासमवेत ख्रिसमस साजरा करण्यासाठी लंडनला तिच्या घरी गेली आहे. त्यानंतर हे दोघे सुट्टी साजरी करणार असून ३ जानेवारीला भारतात परततील आणि ‘जग्गा जासूस’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याची शक्यता असल्याचे, इंग्रजी वृत्तपत्राच्या सूत्रांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 3:52 pm

Web Title: is this for real ranbir kapoor and katrina kaif are breaking up
Next Stories
1 कोल्हापूरात महालक्ष्मीच्या दर्शनाला पोहचली ‘चला हवा येऊ द्या’ची टीम
2 अक्षयचा निमरतसोबत रोमॅण्टिक अंदाज, ‘एअरलिफ्ट’मधील ‘सोच ना सके’ गाणे प्रदर्शित
3 ‘धूम ४’ लवकरचं येतोय; यशराजने प्रसिद्ध केला व्हिडिओ
Just Now!
X